Join us  

कमला मिल आग प्रकरणी चौकशी आयोगाचा अहवाल उच्च न्यायालयात सादर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2018 5:07 AM

कमला मिल आगप्रकरणी चौकशी आयोगाने उच्च न्यायालयात चौकशी अहवाल सादर केला.

मुंबई : कमला मिल आगप्रकरणी चौकशी आयोगाने उच्च न्यायालयात चौकशी अहवाल सादर केला. चौकशी आयोग ३१ आॅगस्टला अहवाल सादर करणार होता. मात्र, आयोगाने उच्च न्यायालयाकडून मुदतवाढ घेत सोमवारी हा अहवाल सादर केला.न्या. भूषण गवई व न्या. मकरंद कर्णिक यांच्या खंडपीठाने मुंबई महापालिकेच्या वकिलांनी आयोगाचा सीलबंद अहवाल सादर केला.गेल्यावर्षी कमला मिलला लागलेल्या आगीत १४ जणांचा मृत्यू झाला. अनेक नियमांना धाब्यावर बसवून ‘वन अबव्ह’ व मोजोस बिस्ट्रो’ या पब्सना परवानगी दिल्याचे लक्षात येताच उच्च न्यायालयाने या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यासाठी निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखालील आयोगाची नियुक्ती केली. उच्च न्यायालयाने या आयोगाला ३१ आॅगस्टपर्यंत चौकशी अहवाल सादर करण्याची विनंती केली. मात्र, दिलेल्या मुदतीत अहवाल सादर करणे कठीण असल्याने आयोगाने न्यायालयात मुदतवाढीसाठी अर्ज केला. जमिनीच्या व रेस्टॉरंटाच्या मालकाने नियमांचे उल्लंघन केले का? आगीचे कारण आदींची चौकशी आयोग करणार आहे.

टॅग्स :कमला मिल अग्नितांडव