कल्याण-ठाणे डाऊन धीम्यासह हार्बरवर मध्य रेल्वेचा मेगाब्लॉक

By Admin | Updated: June 27, 2015 23:35 IST2015-06-27T23:35:11+5:302015-06-27T23:35:11+5:30

मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरील ठाणे-कल्याण डाऊन धीम्यासह हार्बरच्या मस्जिद-चुनाभट्टी आणि वडाळा रोड-माहीम मार्गावरील अप/डाऊन दोन्ही दिशांवर रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.

Kalyan-Thane Down slow on the megha block of Central Railway on Harbor line | कल्याण-ठाणे डाऊन धीम्यासह हार्बरवर मध्य रेल्वेचा मेगाब्लॉक

कल्याण-ठाणे डाऊन धीम्यासह हार्बरवर मध्य रेल्वेचा मेगाब्लॉक

डोंबिवली : मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरील ठाणे-कल्याण डाऊन धीम्यासह हार्बरच्या मस्जिद-चुनाभट्टी आणि वडाळा रोड-माहीम मार्गावरील अप/डाऊन दोन्ही दिशांवर रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. हे ब्लॉक अनुक्रमे स. ११.१५ ते दु. ३.१५, आणि स. ११.३० ते दु. ३.३० या वेळेत घेण्यात येणार आहे.
मुख्य मार्गावरील ब्लॉकमुळे अप धीम्या मार्गावरील गाड्या ब्लॉकच्या कालावधीत कल्याण-ठाणे मार्गावर जलद दिशेवर वळवण्यात येणार आहेत. त्यामुळे अप मार्गावरील कळवा, मुंब्रा, दिवा, कोपर, ठाकुर्ली या स्थानकांदरम्यान लोकल वाहतूक नसेल. त्या मार्गावरील प्रवाशांना डोंबिवली-कल्याण स्थानकातून आहे त्याच तिकिटावर प्रवासाची मुभा देण्यात आली आहे. हार्बरच्या मस्जिद - चुनाभट्टी आणि वडाळा रोड-माहीम स्थानकांदरम्यान दोन्ही दिशांवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे या कालावधीत वाशी / बेलापूर / पनवेलहून सीएसटीला येणारी आणि तेथून सुटणारी तसेच बांद्रा-अंधेरीहून सीएसटीसाठी अप/डाऊनची वाहतूक वाहतूक ब्लॉकच्या वेळेत रद्द केली आहे. कुर्ला-अंधेरीसाठी कुर्ल्याहून फलाट क्रमांक ८ वरुन विशेष लोकल सोडण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले. हार्बरच्या प्रवाशांना विशेषत: बांद्रा-अंधेरी मार्गावरील आहे त्याच तिकिट/पासावर स. १० ते संध्या. ६ या वेळेत पश्चिम रेल्वेवरुन प्रवासाची मुभा असेल. (प्रतिनिधी)

Web Title: Kalyan-Thane Down slow on the megha block of Central Railway on Harbor line