कल्याण : किल्ला बनवताना शॉक लागून १२ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
By Admin | Updated: October 28, 2016 09:17 IST2016-10-28T09:12:49+5:302016-10-28T09:17:04+5:30
दिवाळीनिमित्त किल्ला बनवत असतानाचा वीजेचा शॉक लागून एका १२ वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना कल्याणमध्ये घडली.

कल्याण : किल्ला बनवताना शॉक लागून १२ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
>ऑनलाइन लोकमत
कल्याण, दि. २८ - दिवाळीनिमित्त किल्ला बनवत असतानाचा वीजेचा शॉक लागून एका १२ वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना कल्याणमध्ये घडली आहे. अंकित लोणकर असे त्या मुलाचे नाव असून तो कल्याण पूर्वेकडील हनुमान नगर येथील राधेश्याम अपार्टमेंटमध्ये रहात होता.
बच्चेकपंनीच्या परीक्षा संपल्या असून सर्वांना दिवाळीच्या सुट्ट्या लागल्या आहेत. लहान मुलं फटाके फोडण्यासोबतच किल्ले बनवण्यातही मग्न आहेत. अंकित हाही सह-का-यांसबत किल्ला बनवण्याच्या तयारीत होता. मात्र काल संध्याकाळी त्याचदरम्यान त्याला वीजेचा शॉक लागला आणि त्याचा मृत्यू झाला. दिवाळीच्या पूर्वसंध्येला घडलेल्या या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात शोकाकुल वातावरण आहे.