कळंबोली स्टील मार्केटचा होणार मेक ओव्हर

By Admin | Updated: June 23, 2014 03:08 IST2014-06-23T03:08:16+5:302014-06-23T03:08:16+5:30

आशिया खंडातील सर्वात मोठ्या समजल्या जाणाऱ्या कळंबोलीत स्टील मार्केटचा मेकओव्हर करण्याचा संकल्प मुंबई महानगर प्रदेश लोखंड-पोलाद बाजार समितीने केला आहे

Kalamboli Steel Market will make the makeover | कळंबोली स्टील मार्केटचा होणार मेक ओव्हर

कळंबोली स्टील मार्केटचा होणार मेक ओव्हर

कळंबोली : आशिया खंडातील सर्वात मोठ्या समजल्या जाणाऱ्या कळंबोलीत स्टील मार्केटचा मेकओव्हर करण्याचा संकल्प मुंबई महानगर प्रदेश लोखंड-पोलाद बाजार समितीने केला आहे. पेरी फेरी रोडचे काँक्रीटीकरण जवळपास पूर्णत्वास आले आहेच. त्याचबरोबर इतर अंतर्गत रस्त्यांचे सिमेंटीकरण करण्याचा निर्णय समितीच्या बैठकीत घेण्यात आला. या कामाच्या लवकरच निविदा प्रसिध्द करण्यात येणार असल्याचे चेअरमन गुलाबराव जगताप यांनी सांगितले. या व्यतिरिक्त सिडकोच्या आराखड्यातील पायाभूत सुविधांचा विकास करण्याचेही ठरले आहे.

Web Title: Kalamboli Steel Market will make the makeover