कळंबोली स्टील मार्केट अंधारात
By Admin | Updated: September 16, 2014 01:22 IST2014-09-16T01:22:12+5:302014-09-16T01:22:12+5:30
प्रशासन व स्थानिक संघटनांचे अध्यक्ष मूग गिळून गप्प बसल्याने याचा नाहक त्रस स्थानिक चालक मालक संघटनांना होत आहे.

कळंबोली स्टील मार्केट अंधारात
तळोजा : कळंबोली येथील स्टील मार्केट, बिमा कॉम्प्लेक्स परिसर गेले काही महिने अंधारात आहे. प्रशासन व स्थानिक संघटनांचे अध्यक्ष मूग गिळून गप्प बसल्याने याचा नाहक त्रस स्थानिक चालक मालक संघटनांना होत आहे. त्यामुळे रात्रीच्या वेळी येथे गाडय़ा थांबविणोही चालकांसाठी जोखमीचे ठरत असून लूटमार होण्याच्या भीतीने ट्रक आणि ट्रेलरचे चालक धास्तावले आहेत.
कळंबोली परिसरातील स्टील मार्केटची बाहेरील राज्यातही ख्याती आहे, मात्र स्थानिक प्रशासन व संबंधित नेते याकडे फारसे लक्ष देत नसल्यामुळे या परिसराची प्रतिमा मलीन झाली आहे. कळंबोली ए.सी.सी. सिमेंट कंपनीबाहेरील चौक ते कळंबोली फुडलँड कंपनीच्या साधारण 2 किमीच्या अंतरावर एकही वीजेचा पोल नसून परिसरात चाललेल्या रस्त्याच्या कामामुळे वीज पुरवठा करणो शक्य नसल्याचे सांगत सिडको अधिका-यांनी आपली जबाबदारी झटकली आहे.
कोटय़ावधींची व्यापारी उलाढाल असलेला हा परिसर अंधारात असल्याने स्थानिकांकडून प्रशासनाविरोधात संताप व्यक्त करण्यात येत आहे. या परिसरात स्टीलमार्केट, बिमा कॉम्प्लेक्स, आरटीओ, एमटीएनएल यांची देखील कार्यालये आहेत. परराज्यातून व्यापारीवर्गाच्या वाहतुकीचे प्रमाण वाढत चालल्यामुळे दररोज शेकडो अवजड वाहने परिसरात येत असतात, मात्र परिसरातील अंधाराचा फायदा घेऊन चाललेल्या चोरी, लुटमारीला वैतागून चालक मालक चांगलेच भयभीत झालेले आहेत.
रात्रीच्या वेळेस परिसर अंधारात बुडत असून काही स्थानिक भुरटय़ा चोरामार्फत रात्री कंटेनर फोडण्याचे प्रकार देखील होत आहेत, याला जबाबदार कोण? असा प्रश्न समोर येत आहे. या परिसरातील रस्त्याची कामे पूर्ण झाल्यानंतर आम्ही विजेचे पोल सुरळीत सुरू करणार असल्याचे वीज महामंडळाचे सहाय्यक अभियंता एच. एन. पाटील यांनी सांगितले. (वार्ताहर)