कवी प्रदीप यांचे जागतिक स्मारक उभारावे - विजय दर्डा

By Admin | Updated: February 8, 2015 01:24 IST2015-02-08T01:24:24+5:302015-02-08T01:24:24+5:30

‘ए मेरे वतन कें लोगों, जरा याद करों कुर्बानी... यासारख्या अनेक देशभक्तीपर गाण्यांचे गीतकार कवी प्रदीप यांचे भारतात एक जागतिक स्मारक उभारण्यात यावे.

Kadhe Pradip's world memorial should be raised - Vijay Darda | कवी प्रदीप यांचे जागतिक स्मारक उभारावे - विजय दर्डा

कवी प्रदीप यांचे जागतिक स्मारक उभारावे - विजय दर्डा

श्रीनारायण तिवारी- मुंबई
‘ए मेरे वतन कें लोगों, जरा याद करों कुर्बानी... यासारख्या अनेक देशभक्तीपर गाण्यांचे गीतकार कवी प्रदीप यांचे भारतात एक जागतिक स्मारक उभारण्यात यावे. त्यांच्या जन्मशताब्दी वर्षात त्यांना ही खरीखुरी श्रद्धांजली ठरेल. केंद्र आणि महाराष्ट्र सरकारने यावर गांभीर्यपूर्वक विचार करावा, अशी मागणी राज्यसभेचे सदस्य आणि लोकमत वृत्तपत्र समूहाचे चेअरमन खासदार विजय दर्डा यांनी केली आहे.
कवी प्रदीप जन्मशताब्दी महोत्सवाच्या शुभारंभप्रसंगी आयोजित ‘प्रदीपोत्सव’ या विशेष कार्यक्रमात खासदार विजय दर्डा बोलत होते.
कवी प्रदीप जन्मशताब्दी महोत्सवाची सुरुवात मुंबईतील भाईदास सभागृहात शुक्रवारी झाली. यात कवी प्रदीप यांची ऐतिहासिक आणि लोकप्रिय गीते सादर करण्यात आली. ‘सूर संगम’च्या सहकार्याने सादर करण्यात आलेल्या गीतांनी अवघे सभागृह देशभक्तीने भारावले होते.
कवी प्रदीप फाऊंडेशन आणि विलेपार्ले केळवणी मंडळाच्या संयुक्त विद्यमाने या समारोहाचे आयोजन करण्यात आले होते.
महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती शिवाजीराव देशमुख, महिला व बालकल्याण विकास राज्यमंत्री श्रीमती विद्याताई ठाकूर, खासदार विजय दर्डा, खासदार अविनाश पांडे, माजी खासदार संजय निरुपम, आमदार मुजफ्फर हुसैन, माजी आमदार कृष्णा हेगडे आदी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलित करून समारोहाचा शुभारंभ करण्यात आला. संचालन करणारे डॉ. मनोज सालपेकर आणि कवी प्रदीप यांच्या कन्या मितुल प्रदीप यांनी कवी प्रदीप यांचा जीवनपट उलगडून दाखविला. यावेळी कवी प्रदीप यांची कन्या सरगम याही उपस्थित होत्या.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विलेपार्ले केळवणी मंडळाचे अमरीश पटेल, उत्कल भयानी, भार्गव पटेल आणि कवी प्रदीप फाऊंडेशनचे कोषाध्यक्ष मनोज बिर्ला, अभिजित सपकाळ, सुरेश चौधरी, अजय जोशी, राजू पवार यांनी सहकार्य केले.

....अन् डोळे पाणावले....
च्कवी प्रदीप यांचे ‘ए मेरे वतन कें लोगों....’ हे गीत सादर होत असताना संपूर्ण सभागृह भावुक झाले होते. उपस्थितांचे डोळे पाणवले होते.

Web Title: Kadhe Pradip's world memorial should be raised - Vijay Darda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.