ज्योत्स्ना दर्डा स्मृतिप्रीत्यर्थ ‘भजनसंध्या’ रंगली
By Admin | Updated: March 24, 2015 01:05 IST2015-03-24T01:05:00+5:302015-03-24T01:05:00+5:30
‘लोकमत’ सखी मंचच्या संस्थापक तसेच संगीतसाधक श्रीमती ज्योत्स्ना दर्डा यांच्या द्वितीय स्मृतीनिमित्त ‘लोकमत’ संखी मंचतर्फे ‘भजन संध्या’चे आयोजन करण्यात आले.

ज्योत्स्ना दर्डा स्मृतिप्रीत्यर्थ ‘भजनसंध्या’ रंगली
मुंबई: ‘लोकमत’ मीडिया प्रायव्हेट लिमिटेडच्या संचालक आणि ‘लोकमत’ सखी मंचच्या संस्थापक तसेच संगीतसाधक श्रीमती ज्योत्स्ना दर्डा यांच्या द्वितीय स्मृतीनिमित्त ‘लोकमत’ संखी मंचतर्फे ‘भजन संध्या’चे आयोजन करण्यात आले. दादर पश्चिम येथील वीर सावरकर राष्ट्रीय स्मारक सभागृह येथे हा कार्यक्रम भक्तीरसात पार पडला.
‘भजन संध्या’मध्ये हिंदी-मराठी भजनांच्या स्वरूपात आपल्या सुमधुर आवाजाने चिंतामणी सोहोनी आणि विद्या करलगीकर यांनी रंग भरला. त्यांना निशाद करलगीकर, प्रशांत लळीत, राजू घरत यांनी साथ दिली. तर मंदार खराडे यांनी निवेदन केले.
‘‘भजन संध्या’ कार्यक्रमाची सुरुवात ‘तू प्यार का सागर है’ या भक्ती संगीताने झाली. यानंतर चिंतामणी यांनी आपल्या बहारदार आवाजात ‘मन रे..तू काहे ना धीर धरे..’ सादर केले. विद्या यांनी आपल्या सुरेल आवाजात ‘तोरा मन दर्पन कहलाए...’ सादर केले. अशीच अनेक बहारदार भक्तीगीते यावेळी सादर करण्यात आली. ‘गगन, सदन तेजोमय..’, ‘विठ्ठला तू वेडा कुंभार..’, ‘नाम ना जाने, धाम ना जाने..’, ‘जग मे सुंदर है दो नाम, चाहे कृष्ण कहो या राम’ अशी या समधूर गीतांनाही उपस्थितांनी चांगली दाद दिली. कार्यक्रमाची सांगता ‘लागा चुनरी में डाग छुपाऊ कैसे..’ या भैरवीने झाली.
महाराष्ट्र आणि गोवा येथे ‘लोकमत’ सखी मंचच्या माध्यमातून सुमारे अडीच लाख महिलांच्या सशक्तीकरणाचे यशस्वी प्रयत्न करणाऱ्या ज्योत्स्ना दर्डा यांना संगीतात विशेष रुची होती. त्यांनी आयुष्यभर स्वरांची साधना केली. त्यांच्या संगीत साधनेचा आदर करीत त्यांच्या स्मृतीनिमित्त ‘भजनसंध्या’चे सादरीकरण करण्यात आले. ज्योत्स्ना दर्डा नसल्यातरी यांनी दाखविलेल्या वाटेवरून सखी मंचचा प्रवास अविरत सुरू आहे. कार्यक्रमाला ‘लोकमत’ समूहाचे सहाय्यक उपाध्यक्ष विजय शुक्ला, सहाय्यक महाव्यवस्थापक राघवेंद्र सेठ, मुंबई आवृत्तीचे कार्यकारी संपादक विनायक पात्रुडकर, महाराष्ट्र महिला आयोगाच्या अध्यक्षा चित्रा वाघ व अभिनेत्री हर्षदा गुप्ते यावेळी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
भजनसंध्या
क्षणचित्रे...
च्सावरकर सभागृहात गीतांनी चैतन्य संचारले
च्ज्योत्स्ना भाभींना पुष्पांजली वाहण्यात आली
च्ज्योत्स्ना भाभींच्या आठवणीने अनेकांचे डोळे पाणावले
च्प्रत्येक भक्तीगीताला भरभरुन प्रतिसाद
च्सूत्रसंचलनाने चांगली दाद मिळवली
च्रसिक भक्तीरसात न्हाऊन निघाले
च्भैरवीने भजनसंध्येचा परमोच्च बिंदू गाठला
च्भक्तीगीतांनी वातावरण भारावले होते