मनीषा म्हात्रेमुंबई : नवरात्रोत्सवात दांडिया आणि रास-गरब्याचा उत्साह उत्तरोत्तर वाढत जातो. अशातच कुणीतरी हुल्लडबाजी करायला सुरुवात करतो आणि रंगाचा बेरंग होतो. पण, सावधान... कार्यक्रमात फक्त गरबाच खेळा, छेडछाड किंवा कुणाला त्रास देऊ नका... कारण, पोलिसांचा दंडुका पडू शकतो.
रास-गरब्याच्या ठिकाणी आता महिला पोलिस साध्या वेशात तैनात असणार आहेत. कदाचित त्या तुमच्या बाजूला गरबाही खेळत असतील... छेडछाडीवर लक्ष ठेवण्यासाठी मुंबई पोलिसांनी ही विशेष उपाययोजना केली आहे. नवरात्रोत्सवानिमित्त आयोजित रास-गरबा आणि दांडिया कार्यक्रमात छेडछाड करणाऱ्या तरुणांना नेमके शोधून काढण्यासाठी यंदा पोलिसांचे पथक साध्या वेशात दांडियामध्ये सहभागी होणार आहे. त्यामुळे महिला पोलिसांना दांडिया खेळताना एखादा रोडरोमिओ महिलेची छेड काढताना आढळला तर त्याची खैर नसेल. त्याप्रमाणेच नवरात्रोत्सव यंदा मंडळांनाही सुरक्षेचे धडे देण्यात आले आहेत. त्यामुळे महिलांना सुरक्षित वातावरणात रास-गरबा आणि दांडिया खेळता येणार आहे, असे पोलिसांकडून सांगण्यात आले.
अशा ठिकाणी विशेष लक्षमुंबईतील विविध प्रसिद्ध दांडियांच्या ठिकाणी सिनेकलाकार किंवा सेलिब्रिटी मोठ्या प्रमाणावर हजेरी लावतात.
जिथे तक्रारी जास्त तिथे...ज्या ठिकाणावरून महिलांच्या तक्रारींचे प्रमाण अधिक असेल, त्याठिकाणी पोलिसांची विशेष नजर असणार आहे. तसेच गर्दीच्या ठिकाणीही पाळत असेल.