खोपोलीत कावीळ, मलेरियाची साथ

By Admin | Updated: January 10, 2015 22:31 IST2015-01-10T22:31:40+5:302015-01-10T22:31:40+5:30

कावीळ, मलेरिया व टायफॉईडच्या साथीने सध्या परिसरात थैमान घातले आहे.

Junk, with malaria | खोपोलीत कावीळ, मलेरियाची साथ

खोपोलीत कावीळ, मलेरियाची साथ

खोपोली : कावीळ, मलेरिया व टायफॉईडच्या साथीने सध्या परिसरात थैमान घातले आहे. पालिकेचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय व खाजगी रुग्णालयांमध्ये उपचार करण्यासाठी रुग्णांची मोठी गर्दी होत आहे. दूषित पाण्यामुळे ही साथ पसरल्याचा अंदाज असून काविळीच्या रुग्णांची संख्या मोठी आहे.
अनेक रुग्ण या आजारांवर उपचार करण्यासाठी रुग्णालयात दाखल झाले असून साथीच्या या आजारांमुळे खोपोलीकरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यानिमित्ताने शहराला स्वच्छ पाणी पुरवठा केला जावा, अशी मागणी केली जात आहे.
खोपोलीला टाटा पॉवर कंपनीकडून पाणी पुरवठा केला जातो. या कंपनीच्या पाईप लाईनची दुरुस्ती सध्या सुरू आहे. या ठिकाणाहून गढूळ पाणी येत असल्याने टायफॉईड, कावीळ व मलेरियाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात रुग्णालयात दाखल होत आहेत. पालिकेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात २०० रुग्ण या आजारांवर उपचार करण्यासाठी दाखल झाले आहेत, तर अन्य खाजगी रुग्णालयांमध्ये उपचारासाठी दाखल झालेल्या रुग्णांची संख्या १०० च्या जवळपास आहे. रक्त व लघवी तपासणीसाठीही लॅबमध्ये गर्दी झालेली दिसत आहे.
कावीळवर गावठी उपचार होत असल्याने असे उपचार करणाऱ्यांकडेही रुग्ण जात आहेत. १५ दिवसांपासून ही साथ सुरू असताना पालिकेचे आरोग्य खाते मात्र सुस्त असल्याचे चित्र आहे. पालिकेच्या डॉ. आंबेडकर रुग्णालयात सुनील गायकवाड, बेबी शेख, संध्या रोकडे, प्रकाश बिघाडे, मनीष ओव्हाळ व आकाश यादव हे रुग्ण उपचार घेत आहेत, तर डॉ. सतीश जाखोटीया यांच्या रुग्णालयात शिवाजी नलावडे, सुनील अनिवार व अन्य तीन रुग्ण उपचार घेत आहेत.
शहरातील अनेक खाजगी रुग्णालयातही रुग्णांवर उपचार सुरू असून उपचारानंतर काहींना घरी सोडून देण्यात आले आहे. पालिकेच्या आरोग्य यंत्रणेचे मात्र याकडे दुर्लक्ष झाले असून या आजारांमुळे खोपोलीकरांमध्ये भीतीचे वातावरण आहे. (वार्ताहर)

च्पालिकेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात २०० रुग्ण या आजारांवर उपचार करण्यासाठी दाखल झाले आहेत, तर अन्य खाजगी रुग्णालयांमध्ये उपचारासाठी दाखल झालेल्या रुग्णांची संख्या १०० च्या जवळपास आहे.
च्रक्त व लघवी तपासणीसाठीही लॅबमध्ये गर्दी झालेली दिसत आहे. कावीळवर गावठी उपचार होत आहेत.

Web Title: Junk, with malaria

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.