चालत्या विमानातून उडी मारणारा गजाआड

By Admin | Updated: March 29, 2015 00:52 IST2015-03-29T00:52:22+5:302015-03-29T00:52:22+5:30

विमानतळावर उतरणाऱ्या विमानातून उडी मारून पसार झालेल्या आकाश जैन या तरूणाला मुंबई पोलिसांनी अत्यंत शिताफीने अटक केली.

Jumping off a plane | चालत्या विमानातून उडी मारणारा गजाआड

चालत्या विमानातून उडी मारणारा गजाआड

मुंबई : विमानतळावर उतरणाऱ्या विमानातून उडी मारून पसार झालेल्या आकाश जैन या तरूणाला मुंबई पोलिसांनी अत्यंत शिताफीने अटक केली. काल आकाश चंदीगढहून विमानाने मुंबईला येत होता. धावपटटीवर विमान उतरले इतक्यात त्याने इमर्जन्सी दरवाजा उघडून सुमारे १५ फुटांवरून उडी मारली आणि पसार झाला.
सांताक्रुज पोलिसांनी अत्यंत वेगवान हालचाली करून त्याच्या नातेवाईकांशी संपर्क साधला. नातेवाईकांशी संपर्कात राहून आकाशला पुणे ते मुंबई या प्रवासादरम्यान मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतले.
विमानतळ नियम आणि भारतीय दंड संहितेतील ३३६(स्वत:चा व इतरांचा जीव धोक्यात घालणे)कलमानुसार त्याला अटक करण्यात आली. चौकशीत आकाश मनोरूग्ण असल्याची माहिती पुढे आल्याचे समजते.

Web Title: Jumping off a plane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.