Join us
Daily Top 2Weekly Top 5

ज्युलिओ रिबेरो यंदा ‘पोलीस जीवन गौरव’चे मानकरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2017 01:17 IST

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त आणि पंजाबचे माजी पोलीस महासंचालक ज्युलिओ रिबेरो यांना यंदाचा ‘पोलीस जीवन गौरव’ पुरस्कार जाहीर झाला आहे.

मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त आणि पंजाबचे माजी पोलीस महासंचालक ज्युलिओ रिबेरो यांना यंदाचा ‘पोलीस जीवन गौरव’ पुरस्कार जाहीर झाला आहे. २९ डिसेंबर रोजी जागतिक कीर्तीचे शास्त्रज्ञ रघुनाथ माशेलकर यांच्या हस्ते हा पुरस्कार रिबेरो यांना प्रदान केला जाईल.राज्यातील निवृत्त पोलीस अधिकारी आणि कर्मचाºयांच्या कार्याची दखल आणि कौतुक म्हणून अरविंद इनामदार फाउंडेशनतर्फे हा जीवन गौरव पुरस्कार दिला जातो. राज्याचे माजी पोलीस महासंचालक अरविंद इनामदार यांच्या पुढाकाराने हा उपक्रम सुरू आहे.

टॅग्स :पोलिस