जुहू चौपाटीवर आंतरराष्ट्रीय मरिन पार्क!
By Admin | Updated: August 22, 2014 01:33 IST2014-08-22T01:33:49+5:302014-08-22T01:33:49+5:30
पर्यटकांचे आकर्षण असलेल्या जुहू चौपाटीवर आंतरराष्ट्रीय मरिन पार्कची योजना असून, त्यामुळे जुहू चौपाटीचे रूपडे पालटणार आहे.

जुहू चौपाटीवर आंतरराष्ट्रीय मरिन पार्क!
मनोहर कुंभेजकर - मुंबई
पर्यटकांचे आकर्षण असलेल्या जुहू चौपाटीवर आंतरराष्ट्रीय मरिन पार्कची योजना असून, त्यामुळे जुहू चौपाटीचे रूपडे पालटणार आहे. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या निर्देशाने शासनाच्या पर्यटन संचालनालयाच्या महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने मरिन पार्कचा आराखडा तयार केला असून, या कामाच्या पहिल्या टप्प्याला 13.65 कोटी खर्च अपेक्षित आहे.
पहिल्या टप्प्यात 6 मीटर रुंदीचे पदपथ, जेट्टी आणि फ्लोटिंग जेट्टी, बीच सुरक्षा यंत्रणा, बैठक व्यवस्था, चेजिंग रूम आणि स्वच्छतागृह, बागकाम आणि दिशादर्शक फलक यांचा प्रामुख्याने समावेश असणार आहे. या प्रकल्पाचा अहवाल यापूर्वीच केंद्राकडे पाठविण्यात आला असून, केंद्र शासनाकडून 5 कोटींच्या निधीची अपेक्षा आहे; आणि उर्वरित निधी केंद्रीय योजनेतील राज्य शासनाचा वाटा म्हणून मिळण्याची आशा आहे. केंद्र शासनाची मंजुरी मिळावी म्हणून या प्रकल्पाच्या जागेबाबतचे ना हरकत प्रमाणपत्र आवश्यक आहे. शिवाय या प्रकल्पासाठी जुहू कोळीवाडा ते सातबंगला या संपूर्ण किनारपट्टीच्या विकासाकरिता आवश्यक असणा:या जिल्हाधिकारी (उपनगर) आणि मुंबई महापालिकेसह अन्य सर्व प्रकारच्या लागणा:या ना हरकत प्रमाणपत्रच्या मान्यतेची ‘सिंगल विंडो सिस्टीम’ म्हणून महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने समन्वयकाची भूमिका घेतली आहे, अशी माहिती अंधेरी (प.) येथील काँग्रेसचे आमदार अशोक जाधव यांनी दिली. (प्रतिनिधी)