पश्चिम रेल्वेवरील एसी लोकलचा प्रवास लांबला

By Admin | Updated: April 28, 2017 00:56 IST2017-04-28T00:56:54+5:302017-04-28T00:56:54+5:30

बहुचर्चित एसी लोकलचा पश्चिम रेल्वेवरील प्रवास लांबला आहे. तांत्रिक अडचणींमुळे मध्य रेल्वेवर या लोकलच्या चाचण्या धिम्या गतीने होत आहेत.

The journey of the AC on the Western Railway is a long distance | पश्चिम रेल्वेवरील एसी लोकलचा प्रवास लांबला

पश्चिम रेल्वेवरील एसी लोकलचा प्रवास लांबला

मुंबई : बहुचर्चित एसी लोकलचा पश्चिम रेल्वेवरील प्रवास लांबला आहे. तांत्रिक अडचणींमुळे मध्य रेल्वेवर या लोकलच्या चाचण्या धिम्या गतीने होत आहेत. त्यामुळे ही लोकल पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात दाखल होण्यास आणखी दहा दिवस लागतील, अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली. अकरा महिन्यांपूर्वी बारा डब्यांची एसी लोकल मध्य रेल्वेच्या कुर्ला कारशेडमध्ये दाखल झाली. ही लोकल दाखल झाल्यानंतर काही तांत्रिक समस्यांना सामोरे जावे लागले. या समस्या सोडवण्यासाठी वेळ लागल्यामुळे कारशेडमधील चाचण्यांनादेखील वेळ लागला. अखेर कारशेडमध्ये चाचण्या यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आल्यानंतर कारशेडबाहेर चाचण्यांना महिनाभरापूर्वी सुरुवात करण्यात आली. या चाचण्या यशस्वी झाल्या असल्या तरी आता आणखी आठ चाचण्या बाकी असल्याचे सूत्रांनी सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: The journey of the AC on the Western Railway is a long distance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.