साठ्येमध्ये पत्रकारिता, बौध्द विद्या अभ्यासक्रम
By Admin | Updated: August 14, 2015 22:54 IST2015-08-14T22:54:17+5:302015-08-14T22:54:17+5:30
साठ्येमध्ये पत्रकारिता, बौध्द विद्या अभ्यासक्रम

साठ्येमध्ये पत्रकारिता, बौध्द विद्या अभ्यासक्रम
स ठ्येमध्ये पत्रकारिता, बौध्द विद्या अभ्यासक्रममुंबई : विलेपार्ले येथील साठ्ये महाविद्यालयाने मराठीतून पत्रकारिता आणि बौध्द विद्येचा पदव्युत्तर (एम.ए.बी.एस) असे दोन अभ्यासक्रम सुरु केले आहे. याआधी मराठी पत्रकारिता पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांना मुंबई विद्यापीठापर्यंत पायपीट करावी लागत होती.पत्रकारितेच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमातंर्गत विद्यार्थ्यांना दूरचित्रवाणी, नभोवाणी, चित्रपट या माध्यमांचे पायाभूत प्रशिक्षण देण्यात येईल. जनसंपर्क, संशोधन, ग्राफिक डिझायनिंग, जाहिरात, सोशल मीडिया या क्षेत्रांचा समावेश या अभ्यासक्रमात करत पदव्युत्तर शिक्षण हे सर्वसमावेशक केल्याचे महाविद्यालयाने सांगितले. सोबतच महाविद्यालयाने बौध्द विद्येच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमही सुरू केला आहे. त्यात बौध्द कला, स्थापत्य, तत्त्वज्ञान, साहित्य अशा घटकांचा समावेश करण्यात आला आहे. बौध्द धर्माचे जगाच्या संस्कृतीतील योगदानाचे महत्त्व या अभ्यासक्रमात शिकवले जाणार आहे........................