जोशी-बेडेकरमध्ये ‘नवरंग’

By Admin | Updated: December 8, 2014 23:44 IST2014-12-08T23:44:22+5:302014-12-08T23:44:22+5:30

सध्या कॉलेज कॅम्पस, क्लासरूम कॅन्टीन, सोशल नेटवर्किग साइट या सर्वाची चर्चा सुरू आहे ती कॉलेज फेस्टची. आपला फेस्ट कसा चांगला होईल,

Josh-Bedekar's 'Navrang' | जोशी-बेडेकरमध्ये ‘नवरंग’

जोशी-बेडेकरमध्ये ‘नवरंग’

सध्या कॉलेज कॅम्पस, क्लासरूम कॅन्टीन, सोशल नेटवर्किग साइट या सर्वाची चर्चा सुरू आहे ती कॉलेज फेस्टची. आपला फेस्ट कसा चांगला होईल, यासाठी केवळ प्लानिंगच न करता त्याची आता जोरदार तयारी सुरू असल्याचे चित्र कॉलेज कॅम्पसमध्ये दिसत आहे. क्लासरूम, टेरेस अशा सर्वच ठिकाणी स्टुडंट फेस्टची प्रॅकिटस करीत आहेत. फेस्ट सुरू व्हायला अवघे काही दिवस उरल्याने कॉलेजियन्समध्ये फेस्टचा काउंटडाऊन सुरू झाला आहे. यामुळे महाविद्यालयांमध्ये चैतन्याचे वातावरण पसरले आहे.
 
डिसेंबर महिना म्हटले की, सर्वच महाविद्यालयांत फेस्टिव्हल्स मूड असतो. सगळ्याच कॉलेजमध्ये हे डेज होत असले तरी त्यातही आपापले वेगळेपण जपण्याचा एक प्रय} होतच असतो. ठाण्यातील जोशी-बेडेकर हे कॉलेजही आपले वेगळेपण जपून आहे. या कॉलेजात प्रत्येक इव्हेंट वेगळा होत असल्याने त्याला कॉलेजियन्स गॅदरिंग म्हणत नाही. कारण, गॅदरिंगची स्पेस कमी असते. याउलट इव्हेंटचा स्पॅन मोठा असल्याने त्यात विविध अॅकिटव्हिटी चांगल्या प्रकारे सादर करण्यासाठी मोठा प्लॅटफॉर्म मिळत असल्याचे स्टुडंट्सचे म्हणणो आहे. या कॉलेजात ‘नवरंग’ हा मोठा उत्सव साजरा केला जातो. दर वर्षी एक थीम घेऊन केल्या जाणा:या नवरंगमध्ये सब से हटके असे काही असते. यंदा वुमेन्स पॉवर ही थीम असून नवरंग उत्सवातून विद्यार्थी महिला शक्तीचे सादरीकरण करणार आहेत. चला तर त्याविषयी त्यांच्याकडून जाणून घेऊ या..
भावेश कोळी हा मास मीडियाच्या दुस:या वर्षाला शिक्षण घेत आहे. त्याने सांगितले की, नवरंग उत्सवात तो वक्तृत्व व वादविवादात सहभागी होतो. कॉलेज विषय देते. त्यानंतर विषयानुरूप तयारी केली जाते. स्पर्धेचे विषय हे अभ्यासाला पूरक असतात. त्यामुळे आपले ज्ञान वाढते. आपल्याला सुसंगत विचार करून प्रश्न आणि कारणांची उकल करण्याची सवय लागते. त्याचा चांगला फायदा होतो. 
कॉलेजच्या प्रिन्सिपॉल डॉ. शकुंतला सिंग यांनी सांगितले की, 22 ते 24 डिसेंबर या कालावधीत विविध डे साजरे केले जाणार आहेत. कॉलेज फेस्टिव्हल्सचे स्ट्रक्चर चेंज झाले आहे. या वेळी इव्हेंटची थीम ही वुमेन्स पॉवर आहे. या थीममुळे स्पोर्ट्समध्येही लंगडी, फुगडी आणि लगोरी या महिलाप्रधान पारंपरिक खेळांचाही समावेश करण्यात आला आहे. याशिवाय दर शनिवारी आम्ही पांढ:या किंवा खादी रंगाचे कपडे परिधान करतो. भारतीय संस्कृती त्यातून वाढीस लागावी, असा त्यामागचा उद्देश आहे. नवरंग हा भरगच्च इव्हेंटने भरलेला असून तो विद्याथ्र्यासाठी एक पर्वणी आहे. त्यांच्या कलागुणांना वाव देणारा आणि त्यांच्यातील टॅलेंटला बाहेर काढणारा आहे. नवरंगच्या पाठोपाठ जानेवारीत गंधर्व महोत्सव होणार आहे. या महोत्सवाची थीम क्रिएशन फ्रॉम नथिंग टू एव्हरिथिंग अशी असणार आहे. 
 
समिधा घाग ही टीवायबीएमएमला शिकते. तिने सांगितले की, कॉलेजमध्ये आता विविध प्रकारचे इव्हेंट सुरू होतील. यंदाच्या वर्षी वुमेन्स पॉवर ही थीम घेऊन हा नवरंग उत्सव साजरा होणार आहे. डान्स, म्युङिाक, फाइन आर्ट, नेल आर्ट, मेहंदी, पोस्टर मेकिंग, रांगोळी असे विविध कला प्रकार स्वतंत्ररीत्या भरविले जाणार  आहे. त्यात स्टुडंट सहभागी होणार आहेत. सोमय्या कॉलेजच्या धर्तीवर शॉर्ट फिल्म विद्यार्थी तयार करणार आहेत. ही फिल्म मेकिंग 15 मिनिटांची असणार आहे. दरवर्षीपेक्षा काहीतरी वेगळे करायचे, या उद्देशाने यंदा फिल्म मेकिंग हा विषयही ठेवण्यात आला आहे. यामध्ये विद्यार्थी एखाद्या प्रोजेक्टसाठी केलेली फिल्मदेखील सादर करू शकतात. बेस्ट शॉर्ट फिल्मला पारितोषिक देऊन गौरविले जाणार आहे. सध्या सगळ्यांच्या तालमी सुरू आहेत. प्रत्येक जण तालमीत व्यस्त आहे. यापूर्वी अनेकांर्पयत माहिती जात नव्हती. आता प्रत्येक क्लासमध्ये जाऊन ही माहिती दिली गेल्याने त्याला मिळणारा रिस्पॉन्स हा अभूतपूर्व असेल. नुकत्याच आमच्या कॉलेजमध्ये एकांकिका पार पडल्या, त्यामुळे या इव्हेंटमध्ये एकांकिकांचा समावेश नाही.
 
नवरंग महोत्सवात कितीही मुले अनेक स्पर्धामध्ये सहभागी होऊ शकतात. इव्हेंटचे नियोजन स्टुडंट कौन्सिलकडे असते. त्यांना ते मॅनेज करणो सोपे जाते. या स्पर्धेतून उत्तम परफॉर्मन्स करणा:या स्टुडंटना इंटर कॉलेज कॉम्पिटिशनमध्ये सहभागी होता येते. स्पर्धा आयोजन व नियोजनात काळानुरूप बदल झाले असून त्यांचा फायदा विद्याथ्र्याना होत आहे. कॉलेजात मिस्टर व मिस बेडेकर ही स्पर्धा घेतली जाते. त्यात व्यक्तिमत्त्वासोबत टॅलंटही पाहिले जाते. 

 

Web Title: Josh-Bedekar's 'Navrang'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.