Join us

नोकरीच्या आमिषाने फसवणूक, तरुणाला घातला अडीच लाखांचा गंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2018 04:37 IST

एसीबीमध्ये नोकरी लावण्याचे आमिष दाखवून एका तरुणाला अडीच लाखांचा गंडा घातल्याची प्रकार चेंबूरमध्ये उघडकीस आली. या प्रकरणी तरुणाच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून आरसीएफ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

मुंबई - एसीबीमध्ये नोकरी लावण्याचे आमिष दाखवून एका तरुणाला अडीच लाखांचा गंडा घातल्याची प्रकार चेंबूरमध्ये उघडकीस आली. या प्रकरणी तरुणाच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून आरसीएफ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.चेंबूर परिसरात जयवंत ठोंबरे (५७) कुटुंबीयांसोबत राहतात. गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात त्यांची ठगासोबत भेट झाली. त्याने त्यांच्या मुलाला लाच लुचपत प्रतिबंधक विभागात (एसीबी) नोकरी लावण्याचे आमिष दाखवले. आमिषाला बळी पडत त्यांनी अडीच लाख रुपये त्याला दिले. मात्र, पैसे देऊनही नोकरीबाबत काहीच ठावठिकाणा नसल्याने, त्यांना संशय आला. त्यानी पैसे परत देण्याबाबत तगादा लावला. मात्र, पैसे देण्यास टाळाटाळ सुरू केल्यामुळे त्यांना संशय आला. त्यांनी शुक्रवारी आरसीएफ पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून अधिक तपास सुरू केला आहे.

टॅग्स :गुन्हा