Join us

माझगाव डॉकमध्ये नोकरी; पाकला दिली माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2024 08:23 IST

आरोपीने पाकिस्तानातील व्यक्तीला भारतात संवेदनशील माहिती वेळोवेळी पुरवल्याचे एटीएसच्या आजवरच्या तपासात निष्पन्न झाले. 

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई/नवी मुंबई : देशातील काही संवेदनशील ठिकाणांची माहिती कथितरीत्या पाकिस्तानस्थित एका गुप्तचर संघटनेच्या व्यक्तीला पुरविल्याप्रकरणी राज्य दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) माझगाव डॉकमध्ये नोकरीस असलेल्या ३० वर्षीय तरुणाला नवी मुंबई येथून सोमवारी अटक केली.

आरोपीची नोव्हेंबर, २०२१ ते मे २०२३ या कालावधीमध्ये फेसबुक व व्हॉट्सॲपद्वारे ओळख झाली. संबंधित व्यक्ती ही पाकिस्तानात एका गुप्तचर संघटनेशी निगडित आहे. आरोपीने पाकिस्तानातील व्यक्तीला भारतात संवेदनशील माहिती वेळोवेळी पुरवल्याचे एटीएसच्या आजवरच्या तपासात निष्पन्न झाले. 

 

टॅग्स :एटीएस