जे जे रुग्णालयातून तरुणीचा पळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:06 IST2021-04-05T04:06:29+5:302021-04-05T04:06:29+5:30

संस्थेकड़ून तक्रार दाखल संस्थेकड़ून तक्रार दाखल लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : रक्त तपासणीसाठी जे जे रुग्णालयात नेलेली अल्पवयीन ...

JJ escapes from hospital | जे जे रुग्णालयातून तरुणीचा पळ

जे जे रुग्णालयातून तरुणीचा पळ

संस्थेकड़ून तक्रार दाखल

संस्थेकड़ून तक्रार दाखल

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : रक्त तपासणीसाठी जे जे रुग्णालयात नेलेली अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी जे जे मार्ग पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा नोंदवत पोलीस अधिक तपास करत आहेत.

अँन्टाप हिल येथील आशासदनमध्ये अनाथ , निराधर तसेच गुन्ह्यातील मुलींना सुरक्षितेसाठी ठेवण्यात येते. एका गुन्ह्यातील १६ वर्षीय मुलीला नियमित तपासणीसाठी ३१ मार्च रोजी जे जे रुग्णालयात आणले. तेथे रक्त तपासणी केल्यानंतर हातातून रक्त येत असल्याने त्यांच्यासोबत असलेल्या आया कापूस आणण्यासाठी बाजूला गेल्या. कापूस घेऊन परतल्या तोपर्यंत, मुलगी जागेवर मिळून आली नाही.

त्यांनी सर्वत्र शोध घेतला, मात्र मुलगी मिळून आली नाही. अशात ती पळून गेल्याची माहिती समोर आली. याप्रकरणी जे जे मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस अधिक तपास करत आहे.

Web Title: JJ escapes from hospital