जिंगल बेल्सच्या सुरांत नाताळ साजरा
By Admin | Updated: December 26, 2014 00:02 IST2014-12-26T00:02:58+5:302014-12-26T00:02:58+5:30
जिंगल बेल्स, जिंगल बेल्स, जिंगल आॅल दी वे...या सुरात शहरात मोठ्या उत्साहात नाताळचा सण साजरा करण्यात आला.

जिंगल बेल्सच्या सुरांत नाताळ साजरा
नवी मुंबई : जिंगल बेल्स, जिंगल बेल्स, जिंगल आॅल दी वे...या सुरात शहरात मोठ्या उत्साहात नाताळचा सण साजरा करण्यात आला. ख्रिस्ती बांधवांनी आज सकाळी चर्चमध्ये प्रार्थना केली. त्यानंतर सर्वत्र केक आणि ख्रिसमस ट्रीसह ठिकठिकाणी सांताक्लॉज अवतरले.
संपूर्ण नवी मुंबईतील चर्च, कार्यालये,घरामध्ये रंगीबेरंगी लाईटिंग,ख्रिसमस ट्री तसेच येशूच्या जन्मस्थळाच्या प्रतिकृती उभारण्यात आल्या होत्या. नाताळ हा ख्रिस्ती बांधवांचा मोठा सण असल्याने आज सकाळपासून एकमेकांना शुभेच्छा देण्यात आल्या. या उत्सवासाठी शहरात ठिकठिकाणी संगीताच्या कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले आहे. चर्चमध्ये नेत्रदीपक दीपमाळांचीही सजावट करण्यात आली आहे. त्याचबरोबर विशिष्ट फराळाचीही मोठी रेलचेल आहे. ख्रिसमस ट्री, सांताक्लॉज स्टॉकिंग्स, मुखवटे, सिरॅमिक बाहुल्या, रंगीबेरंगी झालरींनी सजवली गेली आहेत. नवी मुंबईतील मॉल्सदेखील ख्रिसमसच्या आनंदात न्हाऊन निघाले आहेत. ठिकठिकाणी देखावे साकारले होते.