जिया खानच्या मृत्यूची पुन्हा चौकशी व्हावी

By Admin | Updated: June 5, 2014 23:56 IST2014-06-05T23:56:32+5:302014-06-05T23:56:32+5:30

बॉलीवूड अभिनेत्री जिया खानच्या मृत्यूची पुन्हा चौकशी व्हावी, असे आवाहन जियाच्या आईने भारताच्या नव्या सरकारला केले आहे, आपल्या मुलीचा खून झाला, असा त्यांचा आरोप आहे.

Jiah Khan's death should be investigated again | जिया खानच्या मृत्यूची पुन्हा चौकशी व्हावी

जिया खानच्या मृत्यूची पुन्हा चौकशी व्हावी

>लंडन : बॉलीवूड अभिनेत्री जिया खानच्या मृत्यूची पुन्हा चौकशी व्हावी, असे आवाहन जियाच्या आईने भारताच्या नव्या सरकारला केले आहे, आपल्या मुलीचा खून झाला, असा त्यांचा आरोप आहे.
 रबिया खान लंडनमध्ये राहत असून, आपल्या मुलीने आत्महत्या केली नसून तिचा थंड डोक्याने खून करण्यात आला, असा त्यांचा आरोप आहे. ब्रिटनचे परराष्ट्रमंत्री विल्यम हेग यांनी याप्रकरणी हस्तक्षेप करावा, 
असे पत्र त्यांनी  हेग यांना पाठविले आहे. 
जियाचा मृतदेह पाहिल्यापासून मी अत्यंत अस्वस्थ आहे, कारण माङया मुलीचा खून झाला हे मला नक्की माहीत आहे. भारताचे सरकार अद्याप नवीन आहे व या प्रकरणात लक्ष घालण्यासाठी मी फारच लवकर त्यांना विनंती करत आहे; पण ते या विनंतीकडे दुर्लक्ष करणार नाहीत अशी माझी खात्री आहे, असे त्यांनी  म्हटले आहे. 
जिया खानच्या मृत्यूची चौकशी पुन्हा व्हावी, मग ती सीबीआय, एफबीआय वा सिटकडून अशा कोणत्याही संघटनेकडून केली जावी, असे त्यांनी सांगितले.
लंडनमधील चेल्सा टाऊन हॉल परिसरात  जियाच्या मृत्यूला वर्ष झाल्यानिमित्त कार्यक्रमात रबिया खान बोलत होत्या. माङया मुलीचा खून झाला; पण या प्रकरणाची चौकशी दाबून टाकण्यात आली, कोणाच्याही मुलीवर असा प्रसंग येऊ नये, देशात ज्या ज्या मुलीला हिंसाचार सहन करावा लागला, तिला न्याय मिळावा, असेही त्या म्हणाल्या. यावेळी जियाच्या दोन्ही बहिणी करिश्मा व कविता यांचीही भाषणो झाली. (वृत्तसंस्था)

Web Title: Jiah Khan's death should be investigated again