Join us
Daily Top 2Weekly Top 5

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील प्राणी संग्रहालयातील जेस्पा या सिंहाचा मृत्यू 

By सचिन लुंगसे | Updated: November 27, 2022 18:28 IST

बोरीवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील प्राणी संग्रहालयातील जेस्पा या सिंहाचा मृत्यू झाला. 

मुंबई : बोरीवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील प्राणी संग्रहालयातील जेस्पा या सिंहाचा रविवारी वयाच्या ११व्या वर्षी मृत्यू झाला. जेस्पाचा जन्म उद्यानातच २२ सप्टेंबर २०११ रोजी शोभा आणि रवींद्र नावाच्या सिंहापासून झाला होता.

गेल्या अनेक दिवसांपासून जेस्पा आजारी होता. त्यामुळे प्रदर्शनाकरिता त्याला सोडण्यात येत नव्हते. त्याच्यावर उपचारदेखील सुरु होते. मात्र उपचारास त्याने साथ दिली नाही. मुंबई पशु वैद्यकीय महाविद्यालयाचे तज्ज्ञ डॉ. गाढवे यांनी त्याच्या मृतदेहाचे शवविच्छेदन केले असून, प्राथमिक अहवालानुसार अवयव निकामी झाल्याने आणि अशक्तपणामुळे त्याचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. शवविच्छेदनानंतर त्याच्या मृतदेहाचे दहन करण्यात आले आहे, अशी माहिती उद्यान प्रशासनाकडून देण्यात आली.

  

टॅग्स :मुंबईबोरिवलीमृत्यू