वसार्ेवा येथील सर्वधर्मिय नवरात्रोत्सवात जेजुरीचा देखावा
By Admin | Updated: September 29, 2014 23:19 IST2014-09-29T23:19:39+5:302014-09-29T23:19:39+5:30
हॅलोसाठी...

वसार्ेवा येथील सर्वधर्मिय नवरात्रोत्सवात जेजुरीचा देखावा
ह लोसाठी...फोटो मेलवर आहेत.......................वसार्ेवा येथील सर्वधर्मिय नवरात्रोत्सवात जेजुरीचा देखावा मुंबई : सर्वधार्मियांचा नवरात्रौत्सव म्हणून प्रसिद्ध असलेल्या वसार्ेवा,यारी रोड येथील नवरात्रौत्सवात यंदा जेजुरीच्या खंडोबा मंदिराचा भव्य देखावा श्री गणेश साई मंदिर दुर्गा पूजा समितीने उभारला आहे. हा देखावा आणि सिंहावर आरूढ झालेली ९ फूटी दुर्गामातेची भव्य मूर्ती बघण्यासाठी वेसावेकरांसह मुंबई, नवी मुंबई, वसई-विरार येथील नागरिकानी आणि कोळी बांधवांनी पहिल्या दिवसांपासून खूपच गर्दी केली आहे. दुर्गामातेची प्रतिस्थापना मीरा-भाईंदर महापालिकेचे शिवसेना नगरसेवक प्रभाकर म्हात्रे यांनी केली. यावेळी अध्यक्ष कमलाकर पाटील, सचिव विकास पाटील, अशोक सावंत, आनंद नाईक, विनीत पाटील आदी समितीचे सक्रिय कार्यकर्ते उपस्थित होते.प्रसिद्ध कला दिग्दर्शक चंद्रवर्धन मोरे यांनी हा भव्य देखावा साकारला असून दुर्गामातेची मूर्ती मालाड येथील प्रसिद्ध मूर्तिकार पांडुरंग राठोड यांनी घडवली आहे. यंदा येथील नवरात्रोत्सवाचे ३० वे वर्ष आहे. येथील समितीच्या गणपती,साईबाबा आणि दुर्गामातेचे दर्शन घेण्यासाठी दर मंगळवार आणि गुरु वारी येथील मंदिरात भविकांची गर्दी असते. या मंदिरासमोर मदिना मशीद आहे. येथील सर्वधर्मीय नागरिक नवरात्रौत्सवात मोठ्या उत्साहाने सहभागी होतात. (प्रतिनिधी)