जीवनाधार फाउंडेशनचा ‘मुंबै महोत्सव’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:31 IST2021-02-05T04:31:58+5:302021-02-05T04:31:58+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क मुंबई : सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या ‘जीवनाधार फाउंडेशन’चे पुरस्कार जाहीर झाले असून शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, ...

जीवनाधार फाउंडेशनचा ‘मुंबै महोत्सव’
लाेकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या ‘जीवनाधार फाउंडेशन’चे पुरस्कार जाहीर झाले असून शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, क्रीडा आदी क्षेत्रांतील मान्यवरांची या पुरस्कारांसाठी निवड करण्यात आली आहे. अभिनेत्री अलका कुबल-आठल्ये, अभिनेते सयाजी शिंदे, आयेशा झुल्का, अली असगर यांच्यासह मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बालसिंग चहल, माजी मुख्यमंत्री डॉ. मनोहर जोशी, गोपाळ शेट्टी, अजय चौधरी या मान्यवरांना ‘मुंबै भूषण जीवनाधार’ पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
या पुरस्कारांसह ‘मुंबै भूषण’, ‘जीवनाधार जीवन गौरव’, ‘मुंबै गौरव’, ‘मुलखावेगळी माणसे’ या पुरस्कारांचीही घोषणा करण्यात आली असून देवदत्त साबळे, जनार्दन लवंगारे, विजय पाटकर, यशवंत जाधव यांना या अंतर्गत गौरविण्यात येणार आहे. यंदा कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर निमंत्रितांच्या उपस्थितीत २९ व ३० जानेवारीला हा महोत्सव होणार आहे. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर या महोत्सवाच्या अध्यक्षा आहेत. मुंबै महोत्सवात ‘नमन नटवरा’ निर्मित ‘मुंबै मेरी जान’ या कार्यक्रमाच्या सादरीकरणाची धुरा सायली परब सांभाळणार आहेत. यंदा या महोत्सवाचे चौथे वर्ष आहे.
* (सोबत : २ फोटो).
---------------------