जयंत पाटलांना वकीलपत्र
By Admin | Updated: March 24, 2015 01:22 IST2015-03-24T01:22:16+5:302015-03-24T01:22:16+5:30
भाजपाच्या आमदारांची नावे घेऊन त्यांच्या मतदारसंघातील कोणकोणत्या प्रकल्पाकरिता तरतूद नाही याची जंत्री वाचून दाखवायला सुरुवात केली. आपले सरकार असताना कशी रक्कम दिली याचे दाखले दिले.

जयंत पाटलांना वकीलपत्र
अर्थमंत्री या नात्याने नऊवेळा अर्थसंकल्प सादर करून या खात्यावर काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या गेल्या १५ वर्षांच्या राजवटीत नाव कोरले गेलेले जयंत पाटील अर्थसंकल्पावरील चर्चेवर बोलायला उभे राहिले तेव्हा त्यांनी भाजपाच्या आमदारांची नावे घेऊन त्यांच्या मतदारसंघातील कोणकोणत्या प्रकल्पाकरिता तरतूद नाही याची जंत्री वाचून दाखवायला सुरुवात केली. आपले सरकार असताना कशी रक्कम दिली याचे दाखले दिले. या भाजपा आमदारांनीच आपली भेट घेऊन ‘जयंतराव, तुम्ही तुमच्या भाषणात आमच्या प्रकल्पांकरिता तरतूद नसल्याबद्दल बोला. सुधीरभाऊ चर्चेला उत्तर देताना कदाचित त्याची दखल घेऊन तरतूद करतील,’ अशी विनंती केल्याचे जयंत पाटील यांनी जाहीर केले आणि भाजपा आमदारांनी आपल्याकरिता राष्ट्रवादीच्या पाटलांना वकीलपत्र दिल्याचे उघड झाल्याने सत्ताधारी बाकावरील अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्या.