जव्हारमध्ये पाणी उपसून लावणी
By Admin | Updated: July 14, 2014 23:56 IST2014-07-14T23:56:06+5:302014-07-14T23:56:06+5:30
तालुक्यात बहुतांश शेतकऱ्यांनी पाऊस नसल्यामुळे लावणी लांबणीवर टाकली आहे

जव्हारमध्ये पाणी उपसून लावणी
जव्हार : तालुक्यात बहुतांश शेतकऱ्यांनी पाऊस नसल्यामुळे लावणी लांबणीवर टाकली आहे. परंतु थोड्याफार पावसाने नाले, बंधारे, नद्या भरल्यामुळे आणि ज्या शेतकऱ्यांच्या शेताला लागून बंधारे, नदी, नाले आहेत अशा शेतकऱ्यांनी रविवारपासून डिझेल पंपाने पाणी उपसून लावणी करण्यास सुरवात केली, मात्र ज्यांच्याकडे मुबलक पाण्याचा स्त्रोत नाही अशा शेतकऱ्यांना नियमित पावसाची वाट बघावी लागणार आहे. इतर तालुक्यांत पाऊस नियमित पडत असल्यामुुळे तेथे पेरण्या करणे सोपे जात असल्याने तेथील शेतकऱ्यांनी लावणी करण्यास सुरवात केलेली आहे.
जव्हार तालुक्यात पाऊस नसल्यामुळे कधी नव्हे अशी पाण्याची टंचाई भासू लागली आहे. त्यामुळे यंदा जव्हार तालुक्यात दुष्काळजन्य परिस्थिती झालेली आहे. नियमित पावसाची वाट बघण्यापेक्षा काही शेतकऱ्यांनी इतर मार्ग अवलंबून पाण्याची व्यवस्था करण्याकरिता डिझेल पंपाने पाणी उपसून लावणी केली आहे. (वार्ताहर)