जावयाचा सासूवर चाकू हल्ला
By Admin | Updated: December 15, 2014 22:42 IST2014-12-15T22:42:46+5:302014-12-15T22:42:46+5:30
क्षयरोग झाल्याने माहेरी गेलेल्या पत्नीला पाठवा, अशी वारंवार विनंती करूनही पत्नीला पाठवण्यास विरोध करणाऱ्या सासूवर चाकूने वार करून जावयाने गंभीर

जावयाचा सासूवर चाकू हल्ला
खालापूर : क्षयरोग झाल्याने माहेरी गेलेल्या पत्नीला पाठवा, अशी वारंवार विनंती करूनही पत्नीला पाठवण्यास विरोध करणाऱ्या सासूवर चाकूने वार करून जावयाने गंभीर जखमी केल्याची घटना खोपोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत शिळफाटा येथील नवनाथ कॉलनीमध्ये घडली आहे. या प्रकरणी खोपोली पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून जखमी असलेल्या सासूला अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
याबाबत खोपोली पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की चंद्रभागा रामदास पवार (५०) या शिळफाटा येथील नवनाथ कॉलनीमध्ये राहतात. या कॉलनीतच राहत असलेल्या राकेश नायडू यांच्याबरोबर चंद्रभागा यांच्या मुलीचे प्रेमसंबंध जुळले. त्यातून चंद्रभागा यांनी पुढाकार घेवून दोघांना विवाह बंधनात बांधले. सुरुवातीचे काही दिवस आनंदात गेले, मात्र राकेश याला अनेक व्यसने असल्याने काही दिवसात त्याला क्षयरोगाने ग्रासले. त्यावर राकेशवर उपचाराचा कुठलाही परिणाम होत नव्हता. शेवटी मुलीच्या भवितव्याचा विचार करून चंद्रभागा यांनी मुलीला आपल्या घरी नेले, ही गोष्ट राकेशला खटकली होती. त्याने पत्नीला घरी आणण्यासाठी सासूकडे तगादा लावला होता. (वार्ताहर)