जव्हार नगर परिषदेत सत्तांतर! राष्ट्रवादीच्या दहांचा नवा गट

By Admin | Updated: December 19, 2014 23:19 IST2014-12-19T23:19:36+5:302014-12-19T23:19:36+5:30

जव्हार नगरपरिषदेवर राष्ट्रवादीची सत्ता संपुष्टात येणार असल्याचे चित्र आहे. गेले २ ते ३ महिने द्विधा मनस्थितीत

Javar municipal council is the official! NCP's new group | जव्हार नगर परिषदेत सत्तांतर! राष्ट्रवादीच्या दहांचा नवा गट

जव्हार नगर परिषदेत सत्तांतर! राष्ट्रवादीच्या दहांचा नवा गट

हुसेन मेमन, जव्हार
जव्हार नगरपरिषदेवर राष्ट्रवादीची सत्ता संपुष्टात येणार असल्याचे चित्र आहे. गेले २ ते ३ महिने द्विधा मनस्थितीत असलेल्या राष्ट्रवादीच्या १० नगरसेवकांनी अखेर १९ डिसेंबरला पालघर जिल्हाधिकारी अभिजीत बांगर यांच्याकडे जाऊन प्रथम पक्षांतर कायद्यानुसार १० नगरसेवकांनी जव्हार विकास आघाडी गट स्थापन करीत असल्याचे लेखी पत्र दिले. त्याच्या स्वीकृतीनंतर या गटाने नगराध्यक्षांविरूद्ध अविश्वास ठराव दाखल केल्याचे दुसरे पत्र दिले. विकास आघाडीच्या गटनेतेपदी नगरसेवक रविंद्र चावरे यांची निवड केली गेली. अविश्वास ठराव दाखल झाल्यामुळे आता नगरपरिषदेची विशेष सर्वसाधारण सभा घेण्यात येईल व त्यात ठरावावर मतदान घेतले जाईल.
२०१२ मध्ये झालेल्या जव्हार नगरपरिषदेत १७ पैकी १४ नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक निवडून आल्यामुळे त्याची एकहाती सत्ता गेली २ वर्षे होती. बहुमत असले तरी नगरसेवकांच्या एका गटात असंतोष खदखदत होता. प्रत्येक सर्वसाधारण सभा असो वा विषय समित्यांच्या सभेत त्याचे प्रत्यंतर येतच होते.
ठरावीकच पदाधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे शहराच्या विकासाला देखील खिळ बसत होती. विशिष्ट नगरसेवकांच्या दबावाखालीच काम करावे लागत असल्याची नाराजी या १० नगरसेवकांमध्ये कायम होती.
या सर्व राजकीय घडामोडीमुळे संपूर्ण पालघर जिल्ह्यात खळबळ उडाली असून जव्हारची पुनरावृत्ती अन्य स्थानिक स्वराज्य संस्थात देखील होऊ शकते या शक्यतेने जिल्हा राष्ट्रवादीत अस्वस्थता पसरली आहे.
राष्ट्रवादी पक्ष सोडून जव्हार विकास आघाडी गटात नगरसेवक रविंद्र चावरे, रविंद्र भोईर, गणेश रजपुत तर नगरसेविका प्रिती पवार, छाया बल्लाळ, अ‍ॅड. योगिता मुल्गीर, मिना जाधव, सविता वाघचौरे, विमल गोरे, गीता चौधरी यांचा समावेश आहे.
याचे पडसाद अन्य पालिकांत पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे राष्ट्रवादी हादरला आहे.

Web Title: Javar municipal council is the official! NCP's new group

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.