Join us  

Japan Shinzo Abe: शिंजो अबे यांचा दुर्दैवी मृत्यू; महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनीही वाहिली श्रद्धांजली

By ऑनलाइन लोकमत | Published: July 08, 2022 6:08 PM

जपानचे माजी पंतप्रधान शिंजो अबे यांचा शुक्रवारी दुर्देवी मृत्यू झाला.

मुंबई- जपानचे माजी पंतप्रधान शिंजो अबे (Ex Prime Minister Shinzo Abe) यांचा शुक्रवारी दुर्देवी मृत्यू झाला. अबे यांच्यावर आज सकाळी गोळीबार झाला होता. शिंजो हे नारा शहरात भाषण देत असताना एका व्यक्तीने पाठीमागून त्यांच्यावर दोन गोळ्या घाडल्या. एक गोळी त्यांच्या गळ्याला आणि दुसरी छातीत लागली होती.

अचानक झालेल्या हल्ल्यानंतर शिंजो अबे जमिनीवर कोसळले. यादरम्यान त्यांच्या शरीरातून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला. या हल्ल्यानंतर सुरक्षा रक्षकांनी तात्काळ त्या हल्लेखोराला ताब्यात घेतले. दरम्यान, या घटनेमुळे जापानसह सर्वत्र खळबळ उडाली आहे. अनेक देश शिंजो अबे यांच्या मृत्यूवर शोख व्यक्त करत आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील ट्विटरद्वारे श्रद्धांजली वाहिली आहे.

जपानचे सर्वाधिक काळ पंतप्रधान राहिलेले माजी पंतप्रधान आणि भारत मित्र शिंजो आबे यांना भावपूर्ण श्रद्धांजली, असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील शिंजो अबे यांना श्रद्धांजली वाहिली आहे. 'मी माझा सर्वात चांगला आणि प्रेमळ मित्र शिंजो अबे यांच्या निधनाने दुखी झालोय. ते एक महान जागतिक नेते आणि एक उल्लेखनीय प्रशासक होते. त्यांनी आपले जीवन जपान आणि जगाला चांगले बनवण्यासाठी समर्पित केले', असं नरेंद्र मोदी म्हणाले. 

१ दिवसाचा राष्ट्रीय दुखवटा-

माझ्या नुकत्याच झालेल्या जपान भेटीत मला अबे यांना पुन्हा भेटण्याची आणि अनेक मुद्द्यांवर चर्चा करण्याची संधी मिळाली. ही आमची शेवटची भेट असेल, याचा मी विचारही केला नव्हता. शिंजो यांच्याबद्दल आदर व्यक्त करण्यासाठी उद्या दि. ९ जुलै २०२२ रोजी मी एक दिवसाचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करतो, असं नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. 

टॅग्स :जपानएकनाथ शिंदेशिन्जो आबे