जंजिरा किल्ल्यावर रविवारपासून फडकणार तिरंगा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2018 04:51 IST2018-10-27T04:51:38+5:302018-10-27T04:51:41+5:30

केंद्रीय पुरातत्त्व विभागाने दिलेल्या परवानगीनंतर, अखेर मुरूड येथील जंजिरा किल्ल्यावर रविवारपासून कायमस्वरूपी तिरंगा ध्वज फडकविण्यात येणार आहे.

Janjira fort will be flown on Sunday! | जंजिरा किल्ल्यावर रविवारपासून फडकणार तिरंगा!

जंजिरा किल्ल्यावर रविवारपासून फडकणार तिरंगा!

मुंबई : केंद्रीय पुरातत्त्व विभागाने दिलेल्या परवानगीनंतर, अखेर मुरूड येथील जंजिरा किल्ल्यावर रविवारपासून कायमस्वरूपी तिरंगा ध्वज फडकविण्यात येणार आहे. त्या निमित्ताने सह्याद्री प्रतिष्ठानने ढोल-ताशांच्या गजरात शाही सोहळ्याचे आयोजन केले आहे. या सोहळ्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांसह विविध ऐतिहासिक घराण्यांचे वंशज आणि मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
सह्याद्री प्रतिष्ठानचे दुर्ग संवर्धन विभागाचे प्रमुख गणेश रघुवीर यांनी सांगितले की, या सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचे तेरावे वंशज युवराज संभाजी राजे छत्रपती,
सरलेख कान्होजी आंग्रे यांचे
वंशज रघुजी राजे आंग्रे, सरसेनापती खंडेराव दाभाडे यांचे वंशज श्रीमंत सरदार सत्येंद्र राजे दाभाडे
सरकार यांची प्रमुख उपस्थिती असेल.

Web Title: Janjira fort will be flown on Sunday!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.