ST आरक्षणासाठी महाराष्ट्रातील धनगर समाज आक्रमकपणे लढा देणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2021 07:57 AM2021-10-23T07:57:53+5:302021-10-23T07:58:11+5:30

धनगर समाजाला एस टी आरक्षण देण्याबाबत सर्वच राजकीय पक्षानी जाणुन बुजून वंचित ठेवले असून धनगर समाजाचा फक्त मतासाठीच वापर करण्यात आला.

Janajagruti Abhiyan will continue till Dhangar community gets ST reservation - Pravin Kakade | ST आरक्षणासाठी महाराष्ट्रातील धनगर समाज आक्रमकपणे लढा देणार

ST आरक्षणासाठी महाराष्ट्रातील धनगर समाज आक्रमकपणे लढा देणार

googlenewsNext

मुंबई - धनगर समाजाला एसटी आरक्षण मिळेपर्यंत धनगर समाज जनजागृती अभियान महाराष्ट्र भर राबविण्यात येणार आहे असे प्रतिपादन ऑल इंडिया धनगर समाज महासंघाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष प्रविण काकडे यांनी केले. धनगर समाज एसटी आरक्षण जनजागृती अभियानाचा शुभारंभ मुंबईतून सुरु करण्यात आला. या आभियानाची सुरुवात मुंबई चेंबूर घाटला येथून करण्यात आली असून हे आभियान संपूर्ण महाराष्ट्रात राबविले जाणार असून प्रत्येक वाडी वस्ती डोंगर दऱ्याखोऱ्यातील समाज बांधवापर्यंत जाणार असल्याचं काकडेंनी सांगितले. 

प्रविण काकडे म्हणाले की, धनगर समाजाला एस टी आरक्षण देण्याबाबत सर्वच राजकीय पक्षानी जाणुन बुजून वंचित ठेवले असून धनगर समाजाचा फक्त मतासाठीच वापर करण्यात आला. धनगर समाजाला आरक्षण देण्यापासून रोखायचे काम राजकीय नेते मंडळींनी केले असून येणाऱ्या काळात सर्वच राजकीय पक्षाला धनगर समाज जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. धनगर समाजाने जागृत राहून एकसंघ पणे लढा देण्यासाठी युवकांनी एकत्र येऊन राजकीय पक्ष गट तट बाजूला ठेवायलं हवं. या जनजागृती अभियान मोहिमेत सहभागी व्हावं असं आवाहन त्यांनी केले.

तसेच धनगर समाजाचा फक्त वापरा आणि फेका हीच निती राजकीय नेतेमंडळींनी वापरली असून धनगर समाजाने स्वार्थी राजकीय नेतेमंडळीपासून सावध रहावे लागेल. धनगर समाजाची एस टी आरक्षण फक्त अंमलबजावणी करायची आहे.  तरीपण महाराष्ट्र शासन व केंद्र सरकार वेळकाढूपणाचे धोरण अंवलबत आहे. म्हणून महाराष्ट्रातील धनगर समाज आक्रमकपणे लढा देईल असा इशारा ऑल इंडिया धनगर महासंघाच्या वतीने देण्यात आला. या कार्यक्रमास राज्य सचिव नयन सिद, राज्य संघटनमंत्री दयानंद ताटे, मुंबई प्रदेश अध्यक्ष सुभाषराव येळे, मुंबई प्रदेश महिला अध्यक्ष कविता कोकरे, मुंबई प्रदेश उपाध्यक्ष केशवराव कस्तुरे, मुंबई प्रदेश महिला उपाध्यक्ष ललिता हराळे, ठाणे जिल्हा अध्यक्ष दादासाहेब गोरड, रत्नागिरी जिल्हा अध्यक्ष विजयराव गोरे, पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख तुकाराम कोकरे, कोकण प्रदेशाध्यक्ष नवलराज काळे, रायगड जिल्हा अध्यक्ष आनंदराव कचरे, रायगड जिल्हा महिला अध्यक्ष अर्चना शिंदे, सिंधुदुर्ग जिल्हा महिला अध्यक्ष शुभांगी शिंदे, पालघर जिल्हाध्यक्ष महिला सारिका बोडेकर, प्रदेश सल्लागार उत्तमराव सातपुते, संजय सातपुते दरयाबा कोळेकर, गणेश शिंगाडे, सातारा जिल्हा अध्यक्ष सागर डोबाळे, जगन्नाथ काकडे, सुभाषराव एडके, शहाजीराव पाटील उपस्थित होते. 

Web Title: Janajagruti Abhiyan will continue till Dhangar community gets ST reservation - Pravin Kakade

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.