जलधारांनी मुंबईकर चिंब..

By Admin | Updated: September 6, 2014 01:18 IST2014-09-06T01:18:56+5:302014-09-06T01:18:56+5:30

मुंबई शहर आणि उपनगरात जलधारांचे धूमशान सुरूच असून, शुक्रवारी दुपारी कोसळलेल्या मुसळधार पावसाने मुंबईकरांचे हाल केले.

Jaladhar Mumbaikar Chimb .. | जलधारांनी मुंबईकर चिंब..

जलधारांनी मुंबईकर चिंब..

मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरात जलधारांचे धूमशान सुरूच असून, शुक्रवारी दुपारी कोसळलेल्या मुसळधार पावसाने मुंबईकरांचे हाल केले. विशेषत: सकाळी आणि सायंकाळी विश्रंती घेतलेल्या या जलधारांनी ऐन दुपारी जोरदार धडक दिल्याने मुंबईकरांचा ठिकठिकाणी खोळंबा झाला होता.
गेल्या आठ दिवसांपासून पावसाने मुंबईसह राज्याला चांगलेच झोडपून काढले आहे. मुंबईत पावसाचा धडाका सलग सुरू असून, विदर्भ, मराठवाडा, खान्देश आणि कोकणात पावसाने चांगलाच तळ ठोकला आहे. विशेषत: उत्तर आणि दक्षिणोसह अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रचा परिणाम म्हणून मुसळधार पावसाचा जोर कायम असून, शुक्रवारी पडलेल्या दुपारच्या पावसाने मुंबईकरांची चांगलीच दाणादाण उडवून टाकल्याचे चित्र होते. पूर्व उपनगरात सकाळी पडलेल्या उन्हामुळे दिवसभर पाऊस कोसळणार नाही, असा अंदाज बांधत मुंबईकर विनाछत्री बाहेर पडला. मात्र दुपारी साडेबारानंतर जोरदार सरींनी वर्षाव सुरू केला आणि मुंबईला भिजवून टाकले. पश्चिम उपनगरातही साधारणत: हीच परिस्थिती होती. तर दुसरीकडे शहरात मात्र सकाळपासूनच काळेकुट्ट ढग दाटून आले होते. आणि त्यांची गडद छाया रात्री उशिरार्पयत कायम होती. याच काळ्याकुट्ट ढगांमुळे दमदार पावसाने दुपारी साडेबारादरम्यान शहरातही आगमन केले आणि तीन वाजेर्पयत चाकरमान्यांना झोडपून काढले.
मुंबई शहराच्या तुलनेत पूर्व आणि पश्चिम उपनगरात पावसाचा जोर अधिक होता. पश्चिम उपनगरात गोरेगाव, जोगेश्वरी, बोरीवली आणि अंधेरी, पूर्व उपनगरात कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, भांडुपसह चेंबूर आणि मानखुर्द या ठिकाणांवर मुसळधार सरी बरसल्या. तर शहरात फोर्ट, कुलाबा, वरळी, भायखळा, परळ, दादरसह सायनमध्येही जोरदार पावसाने हजेरी लावली. 
दरम्यान, भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, पश्चिम बंगाल, बांगलादेशच्या किना:यालगत असलेल्या उत्तर बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले 
आहे. पश्चिम राजस्थान व 
लगतच्या भागावर असलेल्या कमी दाबाच्या क्षेत्रची तीव्रता वाढून त्याचे रूपांतर ठळक कमी दाबात झाले असून, आता ते वायव्य राजस्थान आणि लगतच्या हरियाणा व पंजाबच्या भागावर आहे. 
कच्छ व लगतच्या भागावर असलेले कमी दाबाचे क्षेत्र विरून 
गेले आहे. समुद्रसपाटीवर दक्षिण गुजरात ते लक्षद्वीपर्पयत असलेला कमी दाबाचा पट्टा आता दक्षिण गुजरात ते केरळच्या किना:यालगत आहे. दरम्यान, दुपारी पडलेल्या जोरदार सरींनी सायंकाळी मात्र विश्रंती घेतली. त्यामुळे मुंबईकरांना काही वेळ का होईना दिलासा मिळाला. (प्रतिनिधी)
 
गोरेगाव येथील मोतीलाल नगरमधल्या म्हाडाच्या जागेवर असलेल्या आदिवासी चाळीतल्या घराचा भाग बांधकामादरम्यान ढासळला. या दुर्घटनेत शारदा व्यास, जेठीबाई व्यास या दोन महिला जखमी झाल्या. त्यांना सिद्धार्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, जखमींची प्रकृती स्थिर आहे.
 
घाटकोपर भटवाडी इथल्या ओमकारेश्वर मंदिराच्या वरील बाजूस असलेल्या तीन झोपडय़ा पडल्या. सुदैवाने या दुर्घटनेत कोणीही जखमी झाले नाही. अंधेरी पश्चिमेकडील डी.एन. नगर रोडवरील घरावर भिंत कोसळून झालेल्या दुर्घटनेत पाच जणांना किरकोळ मार लागला. जखमींवर कूपर रुग्णालयात उपचार करत त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
 
समुद्रकिनारी वेगाने वाहणा:या वा:याला साद घालत पाऊस घेऊन आलेल्या काळ्याकुट्ट ढगांनी मुंबापुरीला व्यापले. हवेत गारवा निर्माण करणा:या या चिंब सरींचा मनमुराद आनंद लुटण्यासाठी मग मरिन ड्राइव्हच्या किनारी तरुणाईची जणूकाही लाटच आली; आणि त्यानंतर सागरी लाटांवर स्वार झालेला हा वरुणराजा दमदार बरसू लागताच त्याला कवेत घेण्यासाठी तरुणाईचे बाहूदेखील विस्तारले. 

 

Web Title: Jaladhar Mumbaikar Chimb ..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.