भाईंदरमध्ये साकारला जय मल्हार

By Admin | Updated: September 4, 2014 23:26 IST2014-09-04T23:26:04+5:302014-09-04T23:26:04+5:30

येळकोट येळकोट जय मल्हार (खंडोबा) रुपी 1क् फुट उंचीच्या गणोशाची मूर्ती प्रतिष्ठापित करणारे भाईंदर येथील श्री भक्ती सार्वजनिक गणोशोत्सव मंडळ यंदा रौप्य महोत्सवी वर्ष साजरे करीत आहे.

Jai Malhar in Bhaindar Sakalya | भाईंदरमध्ये साकारला जय मल्हार

भाईंदरमध्ये साकारला जय मल्हार

राजू काळे ल्ल भाईंदर
येळकोट येळकोट जय मल्हार (खंडोबा) रुपी 1क् फुट उंचीच्या गणोशाची मूर्ती प्रतिष्ठापित करणारे भाईंदर येथील श्री भक्ती सार्वजनिक गणोशोत्सव मंडळ यंदा रौप्य महोत्सवी वर्ष साजरे करीत आहे.  त्या निमित्ताने गेल्या 25 वर्षात प्रतिष्ठापना करण्यात आलेल्या बहुरुपी गणोश मूर्ती शाडूच्या मातीने साकारुन वेगळीच संकल्पना भक्तांसमोर मांडली आहे.
सामाजिक बांधिलकी जपणा:या या मंडळाने 199क् साली गणोशोत्सवाला सुरुवात करुन श्रींची भक्ती अद्यापही जोपासली आहे. सुरुवातीला भाईंदर येथील मूर्तिकार दत्ता रोतळे यांच्यामार्फत साकारण्यात आलेल्या बैठय़ा गणोशमूर्तीचा प्रवास लालबाग, मालाड मार्गे पुन्हा भाईंदर येथेच स्थिरावला आहे. यंदाच्या गणोशोत्सवात सिंहासनावर बसलेल्या जय मल्हाररुपी गणोशमूर्तीची चलती असली तरी मंडळाने मात्र उभ्या 1क् फूट उंचीचा जय मल्हार साकारला आहे. कपाळी भंडा:याचा मळवट भरुन हाती तलवार घेतलेल्या रुबाबदार व देखण्या मूर्तीची भुरळ भाविकांना पाहताक्षणीच पडत आहे. या मल्हाररुपी गणोशाच्या दरबारात गेल्या 25 वर्षात प्रतिष्ठापना करण्यात आलेल्या  या मूर्ती वसईचे मूर्तिकार कृष्णा परब यांच्यामार्फतशाडूच्या मातीपासून तयार करुन त्या स्थानापन्न केल्या आहेत. 
 
4या 25 मूर्तीचा खर्च मंडळातील प्रत्येक कार्यकत्र्याने आपापसात वाटून घेऊन त्याला लोकवर्गणी अथवा राजकीय निधीचा टच लागू दिलेला नाही. या गणोशमूर्ती साकारणा:या मूर्तिकारांचा मंडळाकडून यंदा सत्कार करण्यात येणार आहे. दरवर्षी परिसरातील नागरिकांना वैद्यकीय सेवा पुरविण्याच्या उद्दिष्टाने मंडळाकडून शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे. 
4ठिकठिकाणच्या आपत्कालिन संकटाला निधीचा हातभार लावून  मंडळाने  मदतीचा वसा जपला आहे. सध्याच्या युगात पाश्चात्य संस्कृतीचा उदोउदो होत असताना मंडळाने मात्र भारतीय संस्कृतीचा प्रसार करुन भजन-कीर्तनासारखे कार्यक्रम राबविले आहेत. 
4आपल्या रोजीरोटीला सांभाळून मंडळाचे कार्यकर्ते श्री गणोशाची भक्ती मनोभावे करीत असून या देखण्या मूर्तीला पाहताच भक्तांचे हात आपसूकच जोडले जात आहेत.

 

Web Title: Jai Malhar in Bhaindar Sakalya