जान्हवीने अपघातापूर्वी रिचवले होते १ लीटर मद्य

By Admin | Updated: October 5, 2015 02:50 IST2015-10-05T02:50:41+5:302015-10-05T02:50:41+5:30

कॉर्पोरेट लॉयर जान्हवी गडकर हिने अपघातापूर्वी काळा घोडा येथील आयरिश हाउस पबमध्ये १ लीटर बीअरची आॅर्डर देऊन ती रिचवली, अशी साक्ष तिच्या सहकाऱ्याने पोलिसांना दिली.

Jahanivi had risen 1 litter alcohol before the accident | जान्हवीने अपघातापूर्वी रिचवले होते १ लीटर मद्य

जान्हवीने अपघातापूर्वी रिचवले होते १ लीटर मद्य

मुंबई : कॉर्पोरेट लॉयर जान्हवी गडकर हिने अपघातापूर्वी काळा घोडा येथील आयरिश हाउस पबमध्ये १ लीटर बीअरची आॅर्डर देऊन ती रिचवली, अशी साक्ष तिच्या सहकाऱ्याने पोलिसांना दिली. त्यापूर्वीही जान्हवीने हॉटेल मरिन प्लाझामध्ये व्हिस्कीचे अनेक पेग घेतले होते, असा दावा पोलिसांनी केला आहे.
‘आम्ही प्रत्येकासाठी ५०० एमएल बीअर आॅर्डर केली होती. मी आणि जान्हवीने तो ग्लास रिचवला आणि त्यानंतर दोघांसाठी आणखी ५०० एमएल बीअर मागवली,’ असे रिलायन्स इंडस्ट्री प्रा.लि.चे सीएफओ अलोक अग्रवाल यांनी पोलिसांना सांगितल्याचे दंडाधिकाऱ्यांपुढे दाखल करण्यात आलेल्या ५६० पानी आरोपपत्रात म्हटले आहे. कामासंदर्भात जान्हवीशी चर्चा करायची होती. त्यामुळे कार्यालयातील काम आटपल्यावर जान्हवीला पबमध्ये भेटण्याचा निर्णय घेतल्याचे अग्रवाल यांनी साक्षीत म्हटले आहे.
‘आम्ही दोघेही मध्यरात्री १२:४० वाजता पबमधून निघालो. ती आॅडीमध्ये बसली आणि ती स्वत:च आॅडी चालवू लागली. ती पोहचली की नाही, याची खात्री करण्यासाठी मी तिला सुमारे २ वाजता कॉल केला, तर तिने एक छोटासा अपघात झाला असून नंतर कॉल करते, असे सांगितले. या अपघाताविषयी मला दुसऱ्या दिवशीच समजले,’ असे अग्रवाल यांनी पोलिसांना सांगितले. जान्हवीच्या रक्ताचा नमुना अहवालही आरोपपत्राला जोडण्यात आला आहे. तिच्या रक्तात ३ एमएल अल्कोहोल आढळल्याचे अहवालाद्वारे सिद्ध झाले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Jahanivi had risen 1 litter alcohol before the accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.