जहाँगीर कलादालनात ‘पास्ट अॅण्ड प्रेझेंट’
By Admin | Updated: November 25, 2015 01:38 IST2015-11-25T01:38:46+5:302015-11-25T01:38:46+5:30
तब्बल नऊ वर्षांनंतर सुप्रसिद्ध चित्रकार सुहास बहुळकर यांचे ‘पास्ट अॅण्ड प्रेझेंट’ १८ वे एकल प्रदर्शन जहांगिर कलादालन येथे सुरू झाले आहे.

जहाँगीर कलादालनात ‘पास्ट अॅण्ड प्रेझेंट’
मुंबई : तब्बल नऊ वर्षांनंतर सुप्रसिद्ध चित्रकार सुहास बहुळकर यांचे ‘पास्ट अॅण्ड प्रेझेंट’ १८ वे एकल प्रदर्शन जहांगिर कलादालन येथे सुरू झाले आहे. पास्ट अॅण्ड प्रेझेंट या चित्रमालिकेतून मराठी संस्कृतीच्या स्मरणरंजनासोबतच आधुनिक काळातील स्थित्यंतराचाही अनुभव रसिकांना घेता येणार आहे.
या प्रदर्शनाच्या उद्घाटन सोहळ्यात बहुळकर यांनी लिहिलेली ‘आयुष्याची मौल्यवान माती : शिल्पकार करमरकर’, ‘गोपाळ देऊसकर : कलावंत आणि माणूस’, ‘बॉम्बे स्कूल आठवणीतले, अनुभवलेले’ या तीन पुस्तकांचे प्रकाशन या पुस्तकातील कलावंतांच्या आयुष्यात विविध नात्यांनी आलेल्या तीन स्त्रियांच्या हस्ते म्हणजे करमरकर शिल्पालयाच्या निर्मात्या आणि आधारस्तंभ सुनंदा करमरकर, मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती मृदुला भाटकर आणि चित्रकार, अभ्यासक व लेखिका ज्योत्स्ना कदम यांच्या हस्ते होईल. (प्रतिनिधी)