जेडे प्रकरणाची पुनरावृत्ती टळली
By Admin | Updated: September 7, 2014 01:46 IST2014-09-07T01:46:48+5:302014-09-07T01:46:48+5:30
गुन्हे शाखेच्या मालमत्ता कक्षाने कुख्यात रवी पुजारी टोळीच्या तीन गँगस्टर्सना गजाआड केले. हे तिघे पुजारीच्या आदेशावरून एका पत्रकाराची हत्या करण्याच्या बेतात होते,

जेडे प्रकरणाची पुनरावृत्ती टळली
मुंबई : गुन्हे शाखेच्या मालमत्ता कक्षाने कुख्यात रवी पुजारी टोळीच्या तीन गँगस्टर्सना गजाआड केले. हे तिघे पुजारीच्या आदेशावरून एका पत्रकाराची हत्या करण्याच्या बेतात होते, अशी धक्कादायक माहिती तिघांच्या चौकशीतून समोर आली आहे. अटकेनंतरच्या झाडाझडतीत तिघांकडून संबंधित पत्रकाराचे नाव आणि कार्यालयाचा पत्ताही सापडल्याची माहिती विश्वसनीय सूत्रंकडून मिळते. मालमत्ता कक्षाच्या या कारवाईने बहुचर्चित जे. डे हत्याकांडाची पुनरावृत्ती टळल्याचे बोलले जाते.
गेल्या काही दिवसांमध्ये पुजारी टोळीने शहरातल्या काही प्रसिद्ध व्यक्तींना खंडणीसाठी धमक्या दिल्या होत्या. त्या पाश्र्वभुमीवर पुजारी टोळीच्या हालचालींवर गुन्हे शाखा लक्ष ठेवून होती. टोळीचे शहरातले गँगस्टर्स, त्यांच्या किंवा पुजारीच्या संपर्कात असलेल्यांची माहिती गोळा करण्याचे काम गुन्हे शाखेकडून सुरू होते. अशात मालमत्ता कक्षाचे वरिष्ठ निरिक्षक नंदकुमार गोपाळे यांना त्यांच्या खब:याने मदनचंद गोविंदराम सोनकर उर्फ राजू उर्फ फ्रान्सीस (27) याची माहिती दिली. नालासोपा:याला राहाणा:या सोनकरने नुकतीच एक कार आणि रिव्हॉल्वर विकत घेतल्याची माहिती दिली. त्यानंतर गोपाळे आणि पथकाने सोनकरची माहिती खणून काढली. तेव्हा गेल्या काही दिवसांपासून सोनकर पुजारीच्या संपर्कात होता, अशी माहिती मिळाली.
ही माहिती मिळताच गोपाळे यांच्या मार्गदर्शनाखाली निरिक्षक दिनकर भोसले, एपीआय दिलीप फुलपगारे, चंद्रकांत दळवी, नितीन पाटील, लक्ष्मीकांत साळुंखे, सुनील माने, फौजदार संजय पाटील आणि पथकाने सोनकरच्या हालचालींची माहिती काढली. काल संध्याकाळी मरिन लाईन्स परिसरातून सोनकरसह आशुतोष वर्मा आणि रामबहाददूर चौहाण या तिघांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडे देशी बनावटीचे पिस्तूल, मॅगझीन, 7.65 बोअरची पाच जिवंत काडतुसे, 11 सुटी सिमकार्ड्स सापडली. तसेच एक नकाशाही सापडला. चौकशीत हा नकाशा एका पत्रकाराच्या दक्षिण मुंबईतल्या कार्यालयाचा आहे, अशी माहिती या तिघांनी दिली. तसेच या पत्रकाराचे नावही तपास अधिका:यांना सांगितले.(प्रतिनिधी)