फसवणूक करणारा पोलिसाचा मुलगा जेरबंद
By Admin | Updated: March 29, 2017 06:18 IST2017-03-29T06:18:28+5:302017-03-29T06:18:28+5:30
सरकारी नोकरी देण्याचे अमिष दाखवून गरीब व गरजू कुटुंबियांची फसवणूक करणाऱ्या पोलिसाच्या मुलाला सायन पोलिसांनी

फसवणूक करणारा पोलिसाचा मुलगा जेरबंद
मुंबई : सरकारी नोकरी देण्याचे अमिष दाखवून गरीब व गरजू कुटुंबियांची फसवणूक करणाऱ्या पोलिसाच्या मुलाला सायन पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. मनीष यशवंत मोडकर (४७) असे आरोपीचे नाव असून त्याने ३० ते ३५ जणांची फसवणूक केली आहे.मोडकर याचे वडील मुंबई पोलीस दलात काम करत होते. २००२ मध्ये त्यांचा मृत्यू झाला. ते पूर्वी नायगाव पोलीस वसाहतीत राहायचे. नोकरी अभावी मोडकरने गरीब व गरजू पालकांची फसवणूक करायचा धंदा सुरु केला. तरुण- तरुणींच्या पालकांना सरकारी नोकरीचे अमिष दाखवत असे. पोलिसांचा मुलगा असल्याने पालकही त्याच्यावर विश्वास ठेवत होते. १० हजार रुपयांपासून ५० हजार रुपयांपर्यंत तो त्याच्याकडून पैसे उकळत होता. पैसे देउन देखील नोकरीबाबत मोडकर काहीच माहिती देत नसल्याचे पालकांच्या लक्षात आले. सायन येथील रहिवासी असलेल्या एका कुटुंबाने पोलीस ठाण्यात धाव घेतली. (प्रतिनिधी)