Join us  

जे. जे. रुग्णालयातील डॉक्टरांचा संप अखेर मागे

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2018 5:39 PM

 दोन निवासी डॉक्टरांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ सुरू असलेला जे. जे. रुग्णालयातील डॉक्टरांचा संप अखेर मिटला आहे.

मुंबई -  दोन निवासी डॉक्टरांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ सुरू असलेला जे. जे. रुग्णालयातील डॉक्टरांचा संप अखेर मिटला आहे. डॉक्टरांनी केलेल्या मागण्यांपैकी बहुतांश मागण्यांची पूर्तता झाल्यावर तब्बल चार दिवसांनंतर डॉक्टरांनी हा संप मागे घेतला आहे. चार दिवसांपूर्वी  सर जे. जे. रुग्णालयात दोन निवासी डॉक्टरांना मारहाणा झाली होती. त्या   मारहाणीच्या निषेधार्थ डॉक्टरांनी संप पुकारला होता.  या संपात सरकारी रुग्णालयांसह   पालिका रुग्णालयांतील निवासी डॉक्टरांनी उडी घेतली  होती. केईएम, नायर आणि सायन रुग्णालयातील निवासी डॉक्टरही या संपात सहभागी झाले होते. प्रत्येक वॉर्डमध्ये सुरक्षा रक्षकाची नियुक्ती होत नाही, तोपर्यंत कामावर रुजू होणार नाही, अशी भूमिका या डॉक्टरांनी घेतली होती. 

टॅग्स :जे. जे. रुग्णालयहॉस्पिटलसंपबातम्यामुंबईडॉक्टर