Join us  

ITI शिक्षक 8 महिन्यांपासून पगाराविना, आता राज ठाकरेंकडूनच अपेक्षा

By महेश गलांडे | Published: November 03, 2020 5:16 PM

औद्योगिक प्रशिक्षण संस्थांच्या (ITI) शिक्षकांचं राज्य सरकारकडून गेले ८ महिने थकलेलं वेतन व इतर समस्यांबद्दल 'महाराष्ट्र राज्य आय.टी.आय. तासिका शिक्षक संघर्ष समिती'च्या प्रतिनिधींनी कुष्णकुंज येथे जाऊन राज ठाकरेंची भेट घेतली.

ठळक मुद्देऔद्योगिक प्रशिक्षण संस्थांच्या (ITI) शिक्षकांचं राज्य सरकारकडून गेले ८ महिने थकलेलं वेतन व इतर समस्यांबद्दल 'महाराष्ट्र राज्य आय.टी.आय. तासिका शिक्षक संघर्ष समिती'च्या प्रतिनिधींनी कुष्णकुंज येथे जाऊन राज ठाकरेंची भेट घेतली.

मुंबई - मनसेची सत्ता असो वा नसो, राज ठाकरेंचे आमदार असोत वा नसो, पण राज ठाकरेंकडे प्रश्न घेऊन जाणाऱ्यांची संख्या कमी नसते. त्यामुळेच, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे लॉकडाऊननंतर अनेक संघटना आणि नागरिकांनी प्रश्न मांडले आहेत. वाहन चालक संघटना, मुंबईचे डबेवाले, विद्यार्थी संघटना यांसह अनेकांनी राज ठाकरेंपुढे आपलं गाऱ्हाण मांडल्याचं आपण पाहिलं. आता, आयटीआय शिक्षक संघटनाही राजदरबारी पोहोचल्या आहेत.

औद्योगिक प्रशिक्षण संस्थांच्या (ITI) शिक्षकांचं राज्य सरकारकडून गेले ८ महिने थकलेलं वेतन व इतर समस्यांबद्दल 'महाराष्ट्र राज्य आय.टी.आय. तासिका शिक्षक संघर्ष समिती'च्या प्रतिनिधींनी कुष्णकुंज येथे जाऊन राज ठाकरेंची भेट घेतली. आपल्यावरील अन्यायाचा आणि वेतन नसल्यामुळे होत असलेल्या आर्थिक चणचणीचा पाढाच या पदाधिकाऱ्यांना राजदरबारी मांडला. आता, राज ठाकरेंकडूनच अपेक्षा असल्याचंही संघटनेचे पदाधिकारी म्हणले. त्यामुळे, आता मनसेकडून सरकारला या शिक्षकांच्या पगारीसाठी धारेवर धरले जाईल का, हेच पाहावे लागेल. 

दरम्यान, यापूर्वी मुंबई डबेवाला असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष तळेकर आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी राज ठाकरे यांची भेट घेऊन त्यांच्या विविध मागण्यांचे निवेदन दिले. राज ठाकरे यांनी याबाबत लवकरच आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करू आणि विषय मार्गी लावू, असे आश्वासनही दिले होते. त्यानंतर, डबेवाल्यांचा प्रश्नही मार्गी लागला. पण, राज ठाकरेंनी भेटीला आलेल्या डबेवाल्यांना चिमटा काढला होता. सत्ता त्यांच्या हातात द्या आणि प्रश्न आमच्याकडं आणा... अशी मिश्कील टीपण्णी राज यांनी केली होती.  

टॅग्स :राज ठाकरेमनसेआयटीआय कॉलेजशिक्षक