Join us  

प्रियकरानेच प्रेयसीवर केले चाकूने वार; भांडुपमधील घटना, प्रियकराला अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2023 10:47 AM

भांडुप परिसरात २१ वर्षीय तरुणी राहण्यास आहे. तिचे चेतनसोबत प्रेमसंबंध होते. लग्नासाठी चेतनने तगादा लावला.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : प्रेमसंबंधाला नकार दिल्याच्या रागात प्रियकराने प्रेयसीला खासगी व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत अंधेरीच्या हॉटेलमध्ये नेले. घराकडे परतत असताना चालत्या रिक्षाताच चाकूने मानेवर वार केल्याचा धक्कादायक प्रकार विक्रोळीत घडला. याप्रकरणी भांडुप पोलिसांनी हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी प्रियकर चेतन कमलाकर गायकवाड (वय २७) याला अटक केली आहे. तरुणीवर राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

भांडुप परिसरात २१ वर्षीय तरुणी राहण्यास आहे. तिचे चेतनसोबत प्रेमसंबंध होते. लग्नासाठी चेतनने तगादा लावला. १२ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता चेतनने तिला भांडुप मद्रास कॅफे येथे बोलावले. त्यावेळी प्रेमसंबंध ठेवण्यास प्रेयसीने नकार दिला. त्यावरून दोघांमध्ये वाद झाले आणि त्याने तरुणीला मारहाण केली.  दरम्यान, पुन्हा एलबीएस रोड येथे बोलावले आणि व्हीडीओ व्हायरल करण्याची धमकी दिली. 

बदनामीची धमकी  तरुणी बदनामीच्या भीतीने सोबत येण्यास तयार झाली. रिक्षातून अंधेरीतील एका हॉटेलमध्ये नेवून जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले.   त्यानंतर रिक्षाने भांडुपकडे निघाले. रिक्षा विक्रोळी गांधीनगर परिसरात येताच चेतनने सायंकाळच्या सुमारास जवळील चाकूने तरुणीच्या मानेवर वार केले.   या घटनेने खळबळ उडाली. तरुणीने रिक्षा पार्क साइट पोलिस ठाण्यात वळवली. तेथील पोलिसांनी  तिला भांडुप पोलिस ठाण्याकडे जाण्यास सांगितले.  तेथून तरुणीने पुन्हा भांडुप पोलिस ठाणे गाठले. तेथून पोलिसांच्या मदतीने तरुणीला राजावाडी रुग्णालयात दाखल केले असून पुढील तपास पोलिस करत आहेत. 

टॅग्स :गुन्हेगारी