Join us  

हद्दच झाली; प्रेयसीच्या बदनामीसाठी सिद्धिविनायक मंदिर उडवण्याची धमकी दिली!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2019 1:30 PM

दहशतवादी संघटनांची नावे असलेल्या या संदेशामुळे Viviana मॉल व आजूबाजुच्या परिसरात बंदोबस्त लावण्यात आला होता.

मुंबई - राजधानी मुंबईस्थित जगप्रसिद्ध सिद्धीविनायक गणेश मंदिर बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली होती. ठाण्याच्या विवियाना मॉलमधील बाथरूममध्ये एक संदेश लिहिल्याचे आढळले होते. याप्रकरणी पोलिसांनी एका संशयितास अटक करुन तपास केला. त्यानंतर, पूर्वाश्रमीच्या प्रेयसीची बदनामी करण्यासाठी प्रियकराने हा मेसेज लिहून व्हायरल केल्याचे उघडकीस आले.  

ठाणे येथील Viviana मॉल येथे 16/6/2019 रोजी दुपारी 3.30 वाजण्याच्या सुमारास तळमजला व पहिला माळा बाथरूम मध्ये  Gazva-E- Hind व ISIS यांच्या वतीने "दादर सिद्धिविनायक मंदिर Boom" असा दहशतवादी संदेश आढळून आला. viviana मॉलच्या advertising pamphlet वर sketch पेनाने लिहून त्यावर 9137804380 व दुसऱ्या pamphlet वर 9768450855 असे मोबाईल नंबर लिहून  viviana mall परिसरात व आजूबाजूच्या भागात भयग्रस्त व दहशतवादी वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला होता. 

दहशतवादी संघटनांची नावे असलेल्या या संदेशामुळे Viviana मॉल व आजूबाजुच्या परिसरात बंदोबस्त लावण्यात आला होता. तसेच सदर संदेशाबाबत वरिष्ठांना आणि ATS यांना कळवण्यात आले होते. Pamphlet मधील मोबाईल नंबर वरून कु. दिपाली कांतीलाल भानुशाली यांचा शोध घेऊन त्यांना बोलावून विचारपूस केली असता त्यांनी त्यांचा पूर्वीचा प्रियकर केतन घोडके, राहणार विक्रोळी याने तिची बदनामी व्हावी व तिला पोलिसांकडून त्रास व्हावा म्हणून लिहिला असावा असा संशय व्यक्त केला. त्यानंतर पोलिसांनी विक्रोळी येथे टीम पाठवून घोडके यास ताब्यात घेतले असता त्याने वरील कृत्य केले असल्याचे कबुल केले आहे. सदर घटनेबाबत वर्तक पोलीस ठाण्यात नॉन कॉग्नेझबल गुन्हा क्रमांक  1281 / 2019 कलम 505 IPC प्रमाणे दाखल करण्यात आला आहे. केतन घोडके यास प्रतिबंधक कारवाई खाली अटक करण्यात आली आहे,  अधिक चौकशी चालू आहे.  

टॅग्स :सिद्धिविनायक गणपती मंदिरमुंबईदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्टठाणेगुन्हेगारी