अभिनेता रजत बेदीच्या कारने धडक दिलेल्या इसमाची प्रकृती गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:09 IST2021-09-08T04:09:27+5:302021-09-08T04:09:27+5:30

कूपर रुग्णालयात उपचार सुरू लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : अभिनेता रजत बेदी याच्या कारने धडक दिलेल्या राजेश दूत (३८) ...

Isma, who was hit by actor Rajat Bedi's car, is in critical condition | अभिनेता रजत बेदीच्या कारने धडक दिलेल्या इसमाची प्रकृती गंभीर

अभिनेता रजत बेदीच्या कारने धडक दिलेल्या इसमाची प्रकृती गंभीर

कूपर रुग्णालयात उपचार सुरू

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : अभिनेता रजत बेदी याच्या कारने धडक दिलेल्या राजेश दूत (३८) या कचरावेचकाची प्रकृती अजूनही गंभीरच आहे. सध्या अंधेरीच्या कूपर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. याअपघात प्रकरणी डी. एन. नगर पोलीस तपास करत आहेत.

अंधेरीच्या मेट्रो स्थानकापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या शीतलादेवी मंदिराजवळ राजेश यांना बेदीच्या कारची धडक सोमवारी संध्याकाळी बसली होती. त्यावेळी राजेश दारूच्या नशेत होते. मात्र अपघातानंतर बेदी यांनी त्यांना अंधेरीच्या कूपर रुग्णालयात दाखल केले होते. तसेच उपचाराचा खर्चदेखील त्यांनी केला. अपघातात जखमी झाल्याने राजेश यांच्या शरीरातून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने मंगळवारी त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात येणार होती असेही रुग्णालय सूत्रांचे म्हणणे आहे. राजेश आणि त्यांचे कुटुंब हे अंधेरीत रस्त्यावर राहत असून ते कचरावेचक म्हणून काम करत आहेत.

Web Title: Isma, who was hit by actor Rajat Bedi's car, is in critical condition