आयएसएलचे वेळापत्रक ऑगस्टअखेरीस?

By Admin | Updated: August 20, 2014 00:31 IST2014-08-20T00:31:06+5:302014-08-20T00:31:06+5:30

भारतातील फुटबॉलप्रेमींची उत्कंठा शिगेला पोहोचवणा:या पहिल्या इंडियन सुपर लीगचे (आयएसएल) वेळापत्रक ऑगस्ट अखेरीस जाहीर होणार असल्याचे सूत्रंकडून कळत आहे.

ISL schedule by August-end? | आयएसएलचे वेळापत्रक ऑगस्टअखेरीस?

आयएसएलचे वेळापत्रक ऑगस्टअखेरीस?

मुंबई : भारतातील फुटबॉलप्रेमींची उत्कंठा शिगेला पोहोचवणा:या पहिल्या इंडियन सुपर लीगचे (आयएसएल) वेळापत्रक ऑगस्ट अखेरीस जाहीर होणार असल्याचे सूत्रंकडून कळत आहे.  
21 ऑगस्टला आयएसएलसाठी आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा लिलाव पार पडणार असून, त्यानंतरच वेळापत्रक जाहीर करण्यात येईल. त्यामुळे या महिन्या अखेरीस आयएसएलच्या तारखा निश्चित होतील, असे आयएसएलच्या एका अधिका:याने सांगितले. अखिल भारतीय फुटबॉल महासंघाच्या मान्यतेने होणा:या या स्पध्रेत आठ संघांचा समावेश आहे.  ही स्पर्धा 12 ऑक्टोबर ते 2क् डिसेंबर या कालावधीत होण्याची शक्यता फुटबॉल वतरुळातून वर्तविण्यात येत आहे. 
या स्पध्रेकरिता 49 आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा लिलाव होणार आहे. यात स्पेनचे 9, फ्रान्स, झेक प्रजासत्ताकचे प्रत्येकी 8, ब्राझील, पोतरुगालचे प्रत्येकी 5, कोलंबियाचे 4, दक्षिण कोरियाचे 2 आणि अर्जेटीना, कॅनडा, सर्बिया, सेनेगल, इंग्लंड, ग्रीस, कॅमरून आणि पश्चिम आफ्रिकेच्या कुर्किना फासो येथील प्रत्येकी एका खेळाडूचा समावेश आहे.  एकूण 56 आंतरराष्ट्रीय खेळाडूंपैकी 7 जणांना आयएसएल संघ मालकांनी थेट करारबद्ध केले आहे. याआधी 84 भारतीय खेळाडूंचा लिलाव पार पडला होता.
क्रिस्टोफ दिल्लीत, तर डेवीड बेंजामिन जेम्स केरळ संघात 
जगातील सर्वात उंच गोलकिपर क्रिस्टोफ वॅन हाउट याला दिल्ली डायनामोस संघाने, तर 
केरळा ब्लास्टर्सने डेवीड बेंजामिन जेम्स याला करारबद्ध केले आहे.  
(क्रीडा प्रतिनिधी)
 
जॉनच्या संघाचे व्यवस्थापक रिकी हर्बट
न्यूझीलंडच्या राष्ट्रीय फुटबॉल संघाचे माजी प्रशिक्षक रिकी लॉइड हर्बट यांची अभिनेता जॉन अब्राहमच्या नॉर्थ ईस्ट युनायटेड एफसी संघाच्या व्यवस्थापकपदी निवड करण्यात आली आहे. रिकी यांनी न्यूझीलंच्या पुरुष संघाचे 2क्क्5 ते 2क्13 या कालावधीत प्रशिक्षक म्हणून काम पाहिले आहे. 1982च्या विश्वचषक स्पध्रेत त्यांनी किवी संघाचे प्रतिनिधित्वही केले आहे. 
याबाबत जॉन म्हणाला, आमच्या संघाकरिता रिकी योग्य व्यक्ती आहेत. त्यांचा आंतरराष्ट्रीय स्थरावरील अनुभव आणि युवकांशी संवाद साधण्याची कला ही आमच्या संघाच्या विचारांशी मिळतीजुळती आहे. रिकीमुळे आयएसएलच्या पहिल्याच सत्रत आमचा संघ सर्वोत्तम कामगिरी करेल. आशा करतो की संघाला नक्की फायदा होईल. रिकी यांच्या मदतीला लाजोंग एफसीचे प्रमुख प्रशिक्षक थांगबोई सिंग्टो असतील. 

 

Web Title: ISL schedule by August-end?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.