इंटरनेटवरील इसिस चाहते घटले
By Admin | Updated: February 1, 2015 01:31 IST2015-02-01T01:31:35+5:302015-02-01T01:31:35+5:30
इस्लामिक स्टेट अर्थात इसिसला सहानुभूती दर्शविणाऱ्या बनावट ट्विटर हँण्डल्स आणि फेसबुक अकाउंटसच्या संख्येत लक्षणीय घट झाली आहे.

इंटरनेटवरील इसिस चाहते घटले
कठोर कायद्याचा परिणाम : फेसबुक अकाउंट्सच्या संख्येत लक्षणीय घट
डिप्पी वांकाणी ञ मुंबई
बंगळुरू येथील तंत्रज्ञ आणि इराकहून कल्याणला परतलेल्या आरीफ माजीद याला झालेली अटक आणि त्याच्यावर मित्र देशाविरुद्ध द्रोह केल्याचा लावलेला आरोप यामुळे इस्लामिक स्टेट अर्थात इसिसला सहानुभूती दर्शविणाऱ्या बनावट ट्विटर हँण्डल्स आणि फेसबुक अकाउंटसच्या संख्येत लक्षणीय घट झाली आहे. महाराष्ट्र पोलिसांच्या गुप्तचरांना हा बदल प्रकर्षाने जाणवला आहे.
पोलिसांच्या गुप्तचरांची एक सोशल मीडिया लॅब इंटरनेटवरील बदलणाऱ्या ट्रेण्डस्वर नजर ठेवून असते. यातून काही गंभीर लक्षणीय बाबी निदर्शनास आल्या, तर त्या राज्य सरकारच्या निदर्शनाला आणल्या जातात.
गेल्या दोन महिन्यांत इसिसला सहानुभूती दाखविणाऱ्या बनावट फेसबुक आणि ट्विटर अकाउंट्सची संख्या घटण्याची नोंद गांभीर्याने घेण्यात आली आहे, असे मुंबई पोलिसांच्या स्पेशल ब्रँचमधील एका आयपीएस अधिकाऱ्याने सांगितले. दोस्त राष्ट्राविरुद्ध बेकायदा कृत्यास व द्रोहास प्रतिबंध करणाऱ्या कठोर कायद्यातील कलमांचा वापर संबंधितांविरुद्ध सुरू केल्यानंतरचा परिणाम स्पष्ट जाणवू लागला आहे.
तरुणांचा इसिसच्या उद्देशपूर्तीसाठी कसा बुद्धिभेद केला जातो, हे कल्याणहून इराकला गेलेल्या आरीफ माजीदच्या प्रकरणातून पुरते स्पष्ट झाले आहे. तसेच माजीदविरुद्ध कठोर कलमांचा वापर झाल्यामुळे हे बोगस सहानुभूतीदार इंटरनेटवरून भूमिगत झाल्याचा बदलही दिसून आला आहे. तंत्रज्ञानाच्या गैरवापराचे काय परिणाम होतात, याची जाणीव दृश्य स्वरूपात होऊ लागल्यानंतर चांगला बदल घडून येत असल्याचे या अधिकाऱ्याने सांगितले.
$$्निसोशल मीडियाचा प्रभाव
भारतातील युवकांना आकृष्ट करण्यासाठी आणि स्वत:च्या प्रसार आणि प्रचारासाठी इसिसने सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणावर सुरू केला होता. असंख्य तरुणांना आपल्या प्रभावाखाली आणण्याचे कामही त्यातूून साध्य करत होते.