Join us
Daily Top 2Weekly Top 5

इरफान खानला झालंय तरी काय? 'त्या' ट्विटने सोशल मीडियात खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2018 17:09 IST

बॉलिवूडचा अभिनेता इरफान खान याला एखाद्या गंभीर आजारानं पछाडलं आहे. गेल्या अनेक दिवसांपासून तो काहीसा अज्ञातवासात होता.

मुंबई : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता इरफान खानला एका गंभीर आजारानं पछाडलं आहे. गेल्या अनेक दिवसांपासून तो काहीसा अज्ञातवासात होता. विशेष म्हणजे तो त्याचा येणारा आगामी सिनेमा 'ब्लॅकमेल'च्या प्रमोशनलाही उपस्थित नव्हता. इरफानच्या ट्विटवरून त्याला कोणत्या तरी भयंकर आजाराने पछाडल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी इरफान खानला कावीळ झाल्याची बातमी झळकली होती. तेव्हाही याची कल्पना इरफाननं ट्विटरच्या माध्यमातूनच दिली होती.इरफानने ट्विट करत म्हटलं आहे की, कधी कधी तुम्हाला असे झटके बसतात ज्याने तुमच्या आयुष्यात मोठ्या उलथापालथी होतात. माझ्या आयुष्यातील मागील 15 दिवस हे एका सस्पेंस स्टोरीसारखे राहिले आहेत. मला हे माहिती नव्हतं की दुर्मीळ गोष्टींचा माझा शोध मला एका दुर्मीळ आजारापर्यंत नेईल, असं कधीच वाटलं नव्हतं. मी कधीच पराभव स्वीकारलेला नाही. नेहमीच स्वतःच्या आवडीसाठी मी लढत राहिलोय आणि कायम लढा देत राहणार आहे. माझे कुटुंबीय आणि मित्र परिवार माझ्यासोबत आहेत. आम्ही सगळे जण या आजाराशी चांगल्या पद्धतीनं निपटण्याचा प्रयत्न करतोय. तोपर्यंत तुम्ही काहीही अंदाज वर्तवू नका. येत्या 8 ते 10 दिवसांत रिपोर्ट्स येतील तेव्हा मी स्वत: माझ्या आजाराबाबत तुम्हाला कल्पना देईन, तोपर्यंत माझ्यासाठी तुम्ही प्रार्थना करा.'इरफान खान आजारी असल्यानं त्याची शूटिंगदेखील रद्द करण्यात आली आहे. त्याच्या या ट्विटमुळे आता त्याच्या चाहत्यांच्या इरफानच्या प्रकृतीची चिंता सतावू लागली आहे. 

टॅग्स :इरफान खान