इराणी - पोलिसांमध्ये पुन्हा धुमश्चक्री

By Admin | Updated: June 20, 2015 23:23 IST2015-06-20T23:23:41+5:302015-06-20T23:23:41+5:30

इराणी आणि पोलिसांमध्ये गुरूवारी पुन्हा एकदा धुमश्चक्री झाली. सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्यातील आरोपी बगदादी इराणी यास अटक करण्यास

Irani - Police again fuming | इराणी - पोलिसांमध्ये पुन्हा धुमश्चक्री

इराणी - पोलिसांमध्ये पुन्हा धुमश्चक्री

कल्याण : इराणी आणि पोलिसांमध्ये गुरूवारी पुन्हा एकदा धुमश्चक्री झाली. सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्यातील आरोपी बगदादी इराणी यास अटक करण्यास गेलेल्या एमएफसी पोलिसांना प्रखर विरोधाचा सामना करावा लागला. १० ते ११ जणांच्या टोळक्याने त्यांच्या पथकावर चढविलेल्या हल्ल्यात पोलीस शिपाई चिंतामण कातकडे हे जखमी झाले असून बगदादी पळून जाण्यात यशस्वी झाला आहे.
मागील शनिवारी ठाण्याच्या कापुरबावडी पोलिसांना विरोधाचा सामना करावा लागला होता. त्यावेळी इराणींच्या टोळक्याने चढविलेल्या हल्ल्यात ७ पोलीस कर्मचारी जखमी झाले होते. याप्रकरणी एमएफसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. या गुन्हयातील फरारी आरोपींचा शोध सध्या सुरू असून गुरूवारी रात्री १०.३५ च्या सुमारास आरोपी बगदादी यास अटक करण्यास पोलिसांचे पथक इराणी वसाहतीत गेले होते. पथकाकडून आरोपी बगदादीला ताब्यात घेण्याचा प्रयत्नही झाला. परंतु, वसाहतीतील अन्य इराणींनी पथकावर हल्ला चढवून बगदादीला पळवून लावले. याप्रकरणी त्याच्यासह सिराज, अश्रफी, साकीना, जैनब, मुरबारी, नाझिया, फातिमा, फिजा, फुलसूमआणि फिरदौस यांच्यावर एमएफसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांवर हल्ला झाल्याची ही आतापर्यंतची पाचवी घटना असून गुरूवारी झालेला प्रखर विरोध पाहता पोलिसांना पुन्हा एकदा आरोपीविना माघारी परतावे लागले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Irani - Police again fuming

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.