अपंंगांच्या डब्यातील घुसखोरी रोखणार

By Admin | Updated: December 25, 2014 23:08 IST2014-12-25T23:08:28+5:302014-12-25T23:08:28+5:30

सकाळी ८:१६ च्या डोंबिवली-कर्जत लोकलमध्ये शारीरिक विकलांगांसाठी राखीव असलेल्या डब्यात धडधाकट प्रवाशांनी केलेल्या

Involvement of disabled box | अपंंगांच्या डब्यातील घुसखोरी रोखणार

अपंंगांच्या डब्यातील घुसखोरी रोखणार

डोंबिवली : सकाळी ८:१६ च्या डोंबिवली-कर्जत लोकलमध्ये शारीरिक विकलांगांसाठी राखीव असलेल्या डब्यात धडधाकट प्रवाशांनी केलेल्या घुसखोरीच्या पार्श्वभूमीवर डोंबिवली ईगल ब्रिगेड संस्थेने रेल्वे पोलीस अधिकाऱ्यांबरोबर येथील या व अन्य समस्यांचे निराकरण व्हावे, अशी मागणी केली आहे. तसेच या समस्यांवर तोडगा निघावा आणि असे वर्तन करणाऱ्यांवर कडक कारवाई व्हावी, यासाठी संस्थेने विभागीय पोलीस आयुक्त (आरपीएफ) अलोक बोहरा यांची भेट घेतली. त्यांनीही निश्चित कारवाई केली जात असून यापुढेही करण्यात येईल, असे आश्वासन दिले.
त्यांच्या भेटीत झालेल्या चर्चेत पुलावर फेरीवाले नेहमी आक्रमण करीत असतात. अगदी रात्री उशिरापर्यंत पुलावर झोपलेले असतात. त्यामुळे महिलांना असुरक्षित वाटते, आदींवर प्रकाश टाकण्यात आला.
स्कायवॉक मुख्यत: संध्याकाळी गर्दीच्या वेळी भाजीविक्रेते, फेरीवालेच जास्त वापरतात. शारीरिक विकलांग तसेच गरोदर महिलांना बसण्याची योग्य सुविधादेखील नाही, हेदेखील मांडण्यात आले. त्यानुसार, शुक्रवारी आरपीएफचे सहायक उपायुक्त ए.के. जयस्वाल यांनी डोंबिवलीची पाहणी केली. अनेक गोष्टी त्यांच्याही निदर्शनास आल्या. त्यावर लवकरात लवकर ठोस उपाययोजना करण्याचे तसेच कडक कारवाई करण्याचे आश्वासन देण्यात आले. जयस्वाल यांनीही संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना सांगितले की, शारीरिक विकलांगांसाठी राखीव असलेल्या डब्यात घुसखोरी (शारीरिकदृष्ट्या कार्यक्षम) केलेल्यांवर वर्षभरात १४७३ जणांवर कारवाई करण्यात आली तसेच त्यांना सुमारे रु. ४,०५,८०० चा दंड ठोठावण्यात आला. स्टेशन परिसरात असणाऱ्या १२७५ फेरीवाल्यांवर कारवाई करण्यात आली. (प्रतिनिधी)

Web Title: Involvement of disabled box

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.