Join us

जहाज बांधणी क्षेत्रात २०४७ पर्यंत ८० लाख कोटींची गुंतवणूक अन् दीड लाख नोकऱ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2025 08:25 IST

आतापर्यंत ३ मेरीटाइम समिट पार पडल्या. २०२३ मध्ये देखील झालेल्या समिटमध्ये देखील १० लाख कोटी रुपयांचे सामंजस्य करार झाले होते.

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : २०२७ पर्यंत ८० लाख कोटी रुपयांची गुंतवणूक आणि १.५ कोटी सागरी नोकऱ्या निर्माण होतील, असा विश्वास केंद्रीय बंदर, जल वाहतूक आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी व्यक्त केला. गोरेगाव येथील नेस्को प्रदर्शन केंद्रामध्ये आयोजित पत्रकार परिषेदेत ते बोलत होते. 

दरम्यान, इंडिया मेरिटाइम वीक शिखर परिषद (समिट) २०२५ यावर्षी २७ ते ३१ ऑक्टोबरदरम्यान मुंबईत आयोजित करण्यात येणार आहे. या समिटमध्ये जगभरातून १०० हून अधिक देशांचा सहभाग अपेक्षित असून, १० लाख कोटींच्या गुंतवणुकांचे सामंजस्य करार बंदरे आणि जहाज बांधणी क्षेत्रात होण्याची शक्यता आहे.

१० लाख कोटींचे सामंजस्य करारआतापर्यंत ३ मेरीटाइम समिट पार पडल्या. २०२३ मध्ये देखील झालेल्या समिटमध्ये देखील १० लाख कोटी रुपयांचे सामंजस्य करार झाले होते. त्यापैकी ६० टक्के करार प्रत्यक्षात झाल्याचे केंद्रीय बंदर, आणि जलमार्ग विभागाचे सचिव विजय कुमार यांनी सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गतिमान नेतृत्वाखाली, मेरिटाइम वीक हे एक व्यासपीठ उपलब्ध केले आहे. याठिकाणी कल्पना प्रकल्पांमध्ये आणि वचनबद्धता भागीदारीत रूपांतरित होऊ शकतात. भारत समृद्ध, शाश्वत आणि समावेशक सागरी भविष्याकडे सहकार्य करण्यास आणि नेतृत्व करण्यास तयार आहे. - सर्बानंद सोनोवाल, केंद्रीय बंदर, जल वाहतूक आणि जलमार्गमंत्री.

English
हिंदी सारांश
Web Title : ₹80 Lakh Crore Investment, 1.5 Lakh Jobs in Shipbuilding by 2047

Web Summary : India's maritime sector anticipates ₹80 lakh crore investment, creating 1.5 lakh jobs by 2047. The India Maritime Week Summit 2025 in Mumbai aims for ₹10 lakh crore in agreements. Previous summits saw 60% of agreements realized, fostering maritime growth.