सावरांच्या मतदारसंघातील रोहयोची चौकशी
By Admin | Updated: December 24, 2014 22:49 IST2014-12-24T22:49:57+5:302014-12-24T22:49:57+5:30
विक्रमगड तालुक्यात रोहयोतून कागदोपत्री पूर्ण करण्यात आलेल्या सहाशे विहिरी आणि ७० रस्ते यापैकी खरोखर किती कामे पूर्ण झालीत किती अपूर्ण आहेत

सावरांच्या मतदारसंघातील रोहयोची चौकशी
विक्रमगड : विक्रमगड तालुक्यात रोहयोतून कागदोपत्री पूर्ण करण्यात आलेल्या सहाशे विहिरी आणि ७० रस्ते यापैकी खरोखर किती कामे पूर्ण झालीत किती अपूर्ण आहेत व किती कागदोपत्रीच झालीत याची पहाणी चार दिवस केली जाणार आहे.
या कामावरील मजूरांना कागदोपत्री दाखवलेली मजूरी देण्यात आलेली नाही. काही ठिकाणी बोगस मस्टर भरण्याचे प्रकार घडले त्याचीही चौकशी होणार आहे. याबाबत लोकमतने उठवलेल्या आवाजाला यश आले आहे.
२०११-१२ या वर्षी रोजगार हमीची मोठ्या प्रमाणात कामे सुरू केली. या रोजगार हमीच्या माध्यमातून ६०० विहिरी, ५० ते ७० रस्ते तयार करण्यात आले परंतु गेल्या ४ वर्षापासून विहिरी, रस्ते, नर्सरी अपुर्ण असून काही लाभार्थ्यांची विहिरी पुर्ण झालेल्या आहेत.
परंतु या लाभार्थ्यांना पैसे मिळत नसल्याची गेल्या अनेक दिवसापासून तक्रारी असून याकडे वरिष्ठ अधिकारी लक्ष देण्यास टाळाटाळ करीत आहे. याबाबत लोकमतने पाठपुरावा केला व याची दखल घेवून प्रशासनाने ४ दिवसासाठी या भागातील रोजगार हमीच्या कामाची पाहणी करण्यासाठी कमिटी आली असून या कमिटीने साखरे, विक्रमगड, डोल्हारी (बु.) अशा ग्रामपंचायतीच्या हद्दीतील तक्रारी झालेल्या कामाना भेटी देवून शासनाला अहवालल देण्यात येणार आहे. यामध्यो दोषींवर कारवाई करण्यात येणार आहे.
(वार्ताहर)