अंधेरी रेल्वे स्थानकातील सोनसाखळी चोरीचा तपास करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:18 IST2020-12-04T04:18:51+5:302020-12-04T04:18:51+5:30
अंधेरी रेल्वे स्थानकातील सोनसाखळी चोरीचा तपास करा शिवसेनेची मागणी लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई: गुरुवार, ३ रोजी छत्रपती संभाजीनगर येथील ...

अंधेरी रेल्वे स्थानकातील सोनसाखळी चोरीचा तपास करा
अंधेरी रेल्वे स्थानकातील सोनसाखळी चोरीचा तपास करा
शिवसेनेची मागणी
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई: गुरुवार, ३ रोजी छत्रपती संभाजीनगर येथील रहिवासी श्रीमती अलका लक्ष्मण वाणी यांची अंधेरी प्लॅटफॉर्म क्रमांक-८ येथे चोराने गळ्यातील सोनसाखळी चोरून नेली. या विषयासंदर्भात परिवहन मंत्री व विभागप्रमुख याच्या सूचनेनुसार अंधेरी रेल्वे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय कदम तसेच निकम व गुुन्हे तपास अधिकारी सचिन कांबळे यांची शिवसेनेच्या शिष्टमंडळाने भेट घेत सविस्तर गुन्ह्याचा लवकरात लवकर तपास करावा, अशी मागणी केली.
याप्रसंगी विलेपार्ले विधानसभा समन्वयक नितीन डिचोलकर, उपशाखाप्रमुख नरेश खोत, गीता झगडे, रितेश सोलंकी, उदय पिंपळे आदी मान्यवर उपस्थित होते.
-------------------------------------