टॅब घोटाळ्याची चौकशी करा!

By Admin | Updated: December 19, 2015 02:08 IST2015-12-19T02:08:58+5:302015-12-19T02:08:58+5:30

महानगरपालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या टॅब वाटप योजनेत कोट्यवधीचा घोटाळा झाला असून, त्याची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी

Investigate the tab scam! | टॅब घोटाळ्याची चौकशी करा!

टॅब घोटाळ्याची चौकशी करा!

मुंबई : महानगरपालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या टॅब वाटप योजनेत कोट्यवधीचा घोटाळा झाला असून, त्याची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी राष्ट्रवादीने केली आहे.
पालिकेतील राष्ट्रवादीचे गटनेते धनंजय पिसाळ, सईदा खान आणि इतर नगरसेवकांनी पालिका आयुक्त अजय मेहता यांची भेट घेतली. घोटाळ्याची चौकशी न केल्यास न्यायालयात जाण्याचा इशारा राष्ट्रवादीने दिला आहे.
महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांना टॅब देण्याची घोषणा सत्ताधारी शिवसेनेने केली होती. त्यानुसार टॅब खरेदीचा प्रस्ताव पालिकेत आणण्यात आला. पण या प्रस्तावात अनेक त्रुटी असल्याचा आरोप करीत विरोधी पक्षांनी त्याला विरोध केला होता.
तरीही बहुमताच्या जोरावर सेना-भाजपाने टेक्नो इलेक्ट्रॉनिक्स कंपनीला टॅबचे कंत्राट दिले.
पालिकेने २१ हजार टॅब विद्यार्थ्यांना वितरित केले आहेत. पालिकेने व्हिडीओकॉन कंपनीचे टॅब सांगून चायनामेड बोल्ड कंपनीचे टॅब वितरित केल्याने यामध्ये कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसने केला आहे.

Web Title: Investigate the tab scam!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.